मुंबई : वांद्रे (प) येथील माऊंट मेरी जत्रा सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवडयापासून सुरू होत असून त्या निमित्त १५ सप्टेंबरपर्यंत जादा बस चालवण्यात येणार आहेत. बेस्टकडून संपूर्ण आठवडाभर १२१ अतिरिक्त बस वांद्रे रेल्वे स्थानक (प.) ते हिल रोड उद्यान या दरम्यान चालवण्यात येतील. तसेच बेस्ट बसमार्ग क्रमांक सी-७१, ए-२०२, ३२१ मर्या., ए-३७५, ४२२, ४७३ व सी-५०५ या बसमार्गावर अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येतील.

हेही वाचा : Amit Shah Mumbai : महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको! अमित शहा यांची सूचना; पक्षाच्या निवडणूक तयारीचा आढावा

capacity of 200 e-bus charging stations in the ST fleet will also increase in one year
एसटीच्या ताफ्यात वर्षभरात २०० ई-बस चार्जिंग स्टेशनची क्षमताही वाढणार
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Metro 2A , Metro 7, Metro speed , Metro ,
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ सुसाट, ताशी ८० किमी वेगाने मेट्रो धावणार
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर
private bus drivers, Amravati, RTO, action by RTO,
अमरावती : खासगी बसचालकांना दणका, आरटीओकडून दंडात्मक कारवाई
Sleeper Vande Bharat Express , Sleeper Vande Bharat,
नागपूर, पुणे, मुंबईकरिता स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस
Central railway special trains cancelled delayed
१० महिन्यात २०२ विशेष रेल्वेगाड्या रद्द, १ हजार १४६ विशेष गाड्यांना बिलंब
passenger and memu special trains running from cr bhusawal division of operated with regular numbers
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे…‘या’ गाड्यांमध्ये आजपासून झाले बदल

माऊंट मेरी चर्च, फादर अॅग्नल आश्रम या परिसरात जत्रेसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असते. यात्रेकरू मोठ्या प्रमाणावर वांद्रे स्थानक (प) येथे लोकलने येऊन तेथून बेस्टच्या बसने प्रवास करतात. परंतु बस माऊंट मेरी चर्चपर्यंत चालवणे शक्य नसते. त्यामुळे वांद्रे रेल्वे स्थानक (प) ते हिल रोड उद्यान दरम्यान जादा बस सोडण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त वांद्रे परिसरातून धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या नियमित बसमार्गावरही अतिरिक्त बसगाडया चालवण्यात येतील. जत्रेनिमित्त वांद्रे स्थानक (प) आणि माऊंट मेरी चर्च परिसरात होणारी प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन प्रवाशांना योग्य मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती संपूर्ण कालावधीसाठी केली आहे. प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Story img Loader