लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेमध्ये दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने येत्या शनिवारी (२४ ऑगस्ट) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदमध्ये जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे.

article 370 jammu and kashmir
संविधानभान : पूल, भिंत की बोगदा?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
BJPs grand convention at Chhatrapati Sambhajinagar in the presence of Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपचे छत्रपती संभाजीनगरला महाअधिवेशन
road along Seawoods creek flamingo habitat was recommended for closure
फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
bus station in Kurla, commuters problem Kurla,
कुर्ल्यातील बस स्थानक बंद केल्याने प्रवाशांना पायपीट
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
bjp sujay patki
पहिली बाजू : आता महाराष्ट्र थांबणार नाही!

शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने दोन विद्यार्थिनींवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद मंगळवारी बदलापूरमध्ये उमटले. संतप्त जमावाने बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करत दहा तासांपेक्षा अधिक काळ मध्य रेल्वे मार्ग रोखून धरला होता. महाविकास आघाडीने बुधवारी विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा रद्द केली. बैठकीत महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांसंदर्भात संताप व्यक्त करत शनिवारी राज्यव्यापी बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी मंत्री अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, शिवसेना नेते संजय राऊत आदी उपस्थित होते.

Story img Loader