केंद्रात मंत्रीपदावर असलेल्या एका मोठय़ा राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या आयुष्यावर प्रेरित होऊन काढलेला ‘घे झेप पाखरा रे’ हा चित्रपट गेली अडीच वर्षे रखडला आहे. परिनिरीक्षण मंडळाने या चित्रपटाला परवानगी पत्र देताना या राजकीय व्यक्तीचे संमतीपत्र मागितले होते. मात्र त्यांनी नकार दिल्याने चित्रपट निर्मात्याला या व्यक्तीबाबतचे सगळेच संदर्भ बदलावे लागले.
दहा लाखांपर्यंत खर्च करूनही आता परिनिरीक्षण मंडळ प्रमाणपत्र देण्याचे टाळत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एका वजनदार नेत्याच्या संघर्षमय कहाणीवरून प्रेरित होऊन त्याच भागातील रॉकसन नावाच्या निर्मात्याने त्या नेत्याच्या आयुष्यावर चित्रपट काढण्याचे ठरवले. या नेत्याला तसे सांगितले असता त्याने आपला होकारही दर्शवला. एप्रिल २०१२च्या सुरुवातीला या नेत्याच्या उपस्थितीतच चित्रपटाचा खास पहिला खेळ एका छोटेखानी चित्रपटगृहात दाखवला. तेथे या नेत्याने चित्रपटात काही बदल सुचवल्याचे पटकथा व संवाद लेखक आणि या नेत्याची प्रमुख भूमिका करणाऱ्या मनीष कुलकर्णी यांनी सांगितले. 

Story img Loader