‘मराठी भाषेत भावभावनांचा ओलावा, सशक्तपणा आहे. जो इतर कोणत्याही भाषेत नाही. मराठी भाषा तितकीच क्लिष्टही आहे. मी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु अभिनय व दिग्दर्शनाच्या गडबडीत व्यवस्थितपणे शिकू शकलो नाही’ अशी कबूली देताना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट हिंदीपेक्षा मराठी भाषेत अधिक प्रभावी वाटला, असे मत अभिनेता रणदीप हुडा याने व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> बारसू येथील कातळ शिल्पांची युनेस्कोकडून दखल, मग आपल्याकडून का नाही ? उच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या बहुचर्चित चित्रपटाचा मराठी ट्रेलर सोमवार, ११ मार्च रोजी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रदर्शित करण्यात आला. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी आणि सावकरप्रेमींनी हजेरी लावली होती. तसेच चित्रपटाचा दिग्दर्शक व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता रणदीप हुडा, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नीची म्हणजेच यमुनाबाईंची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि निर्माते योगेश रहार उपस्थित होते. हा चित्रपट २२ मार्च रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महाराष्ट्राच्या गावखेड्यातआणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा या उद्देशाने मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत प्रदर्शित करीत आहोत’, अशी माहितीही रणदीप हुडा यांनी दिली.

रणदीप हुडा यांनी या चित्रपटात सावरकरांची भूमिका केली आहे आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुराही त्यांनीच सांभाळली आहे. या निमित्ताने सावरकरांचा समग्र अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले. ‘तुम्ही चित्रपटात एखादी व्यक्तिरेखा साकारत असताना त्या व्यक्तिरेखेसारखे हुबेहूब दिसणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे असते. तरच प्रेक्षक ती कलाकृती आवर्जून पाहतात. सावरकरांची भूमिका अचूक वठवता यावी यासाठी मी त्यांच्यावर आधारित साहित्यातून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे बहुरंगी होते. देशप्रेम ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे’, असेही रणदीप हुडा म्हणाले. यावेळी रणदीप हुडा आणि अंकिता लोखंडे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यार्थीदशेत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ज्या वसतिगृहातील खोलीत राहत होते, त्या खोलीलाही भेट दिली आणि सावरकरांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

हेही वाचा >>> भारतात घरफोड्या करणारी बांगलादेशी नागरिकांची टोळी अटकेत

सुबोध भावे हा एक उमदा कलाकार – रणदीप हुडा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या मराठी आवृत्तीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेला अभिनेता सुबोध भावे यांनी आवाज दिला आहे. सुबोध भावे हा एक उमदा कलाकार आहे. मराठी चित्रपटासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेला आवाज कोण देणार? असे जेव्हा मला विचारले. तेव्हा माझ्या तोंडातून आपसूकच सर्वप्रथम सुबोध भावे यांचे नाव आले, असे रणदीप हुडा यांनी विशेष नमूद केले.