मुंबई : मुलाच्या फायद्यासाठी खासदार गजानन कीर्तिकर हे पक्षाशी गद्दारी करीत असल्याचा थेट आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी करताच कदम यांच्या गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे, असे प्रत्युत्तर कीर्तिकर यांनी दिले आहे. या दोन नेत्यांमधील वादामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली आहे.

 मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी काही दिवसांपूर्वी आपण आता थकलो असून, आगामी लोकसभा निवडणूक लढणार नाही, असे वक्तव्य केले होते. ‘‘कीर्तिकर आगामी लोकसभा लढविणार नसतील तर माझे दुसरे चिरंजीव सिद्धेश कदम हे या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयार आहेत’’, असे रामदास कदम यांनी जाहीर करून टाकले. त्यानंतर कीर्तिकर यांनी आपण मानसिक व शारीरिकदृष्टया तंदुरुस्त असून आगामी निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले. कीर्तिकर यांचे पुत्र अमोल हे शिवसेनेच्या ठाकरे गटात आहेत. यावरून रामदास कदम यांनी पुन्हा कीर्तिकर यांना लक्ष्य केले. कीर्तिकर पिता-पुत्र एकाच कार्यालयात बसून काम करतात. कीर्तिकर हे पक्षाशी गद्दारी करीत असल्याचा आरोप कदम यांनी केला. मुलाला निवडून आणण्याचे त्यांचे सारे प्रयत्न सुरू आहेत, असाही कदम यांचा सूर होता.

loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
amshya padawi
शपथविधीदरम्यान शिंदेंच्या आमदाराचा गोंधळ, एकही शब्द व्यवस्थित वाचता येईना!
The BJP has promised to accommodate the concerns of alliance partners both in terms of representations and other important portfolios
Home Ministry : गृहखातं देण्यास भाजपाचा नकार; शिवसेनेला ‘या’ खात्यांचा दिला पर्याय!

हेही वाचा >>>मंत्रालयासमोर गगनचुंबी इमारत बांधण्याचा प्रस्ताव; ‘मेट्रो’चा आर्थिक भार कमी करण्यासाठी योजना

कदम यांच्या आरोपांना कीर्तिकर यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले. कदम यांनी आपल्यावर गद्दारीचा संशय व्यक्त केला आहे, मात्र कदमांचा गद्दारीचा इतिहास जुना असून त्यांनी यापूर्वी १९९० मध्ये आपल्या पराभवासाठी अनेक प्रयत्न केले होते. कदम यांनी आपल्या भावाच्या पराभवासाठी कार्यकर्त्यांना दमबाजी केली होती. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांनी शरद पवारांबरोबर खेड- पुणे केलेला प्रवास सर्व शिवसैनिकांना माहीत असल्याचा टोला कीर्तिकर यांनी लगावला आहे. त्यामुळे कदम यांनी गद्दारीबद्दल बोलू नये, असे कीर्तिकर यांनी या पत्रकात म्हटले आहे.

  शिवसेनेत फूट पडल्यापासून नेतेमंडळींना आपल्या गटात सहभागी करून घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांना अनेक वेळा मिनतवाऱ्या कराव्या लागल्या. मुंबईत ठाकरे गटाला शह देण्याचा शिंदे यांचा प्रयत्न सुरू असतानाच रामदास कदम आणि कीर्तिकर या दोन्ही वृद्धत्वाकडे वळलेल्या आणि जनाधार गमाविलेल्या नेत्यांमध्येच जुंपली आहे. या वादावर तोडगा काढण्याचे प्रयत्न शिंदे यांना करावे लागणार आहेत. अन्यथा दोघांपैकी एक नेता परत ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता वर्तविली जाते.

रामदास कदम हे अनेक वर्षे आमदार होते. मंत्रिपद, विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. त्यांचे पुत्र आमदार आहेत. आता दुसऱ्या पुत्राला खासदारकीचे वेध लागले आहेत. सारी पदे नेतेमंडळींच्या घरातच वाटायची का, असा सवाल शिंदे गटाचे कार्यकर्ते करू लागले आहेत.

Story img Loader