मुंबई : खासदार रवींद्र वायकर यांच्या मोटरगाडीला गोरेगाव परिसरात रविवारी रात्री अपघात झाला. वायकर यांचा चालक मोटरगाडी चालवत होता. अपघात किरकोळ स्वरूपाचा असून त्यात कोणीही जखमी झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मुंबई : कारवाई केल्याच्या रागातून पोलिसावर हल्ला

हेही वाचा – मुंबई : देवनारमध्ये कचऱ्यापासून दुप्पट वीजनिर्मिती

गोरेगाव पूर्व येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ रविवारी सायंकाळी ७.४५ च्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एक मोटारसायकलस्वार वायकर यांच्या मोटरगाडीच्या उजव्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी मोटारसायकलची वायकर यांच्या गाडीला धडक बसणार होती. अपघात टाळण्यासाठी चालकाने मोटरगाडी बाजूला वळवली. त्यावेळी मोटरगाडी तेथील ट्रकला घासली. त्यामुळे वायकर यांच्या मोटरगाडीचे नुकसान झाले. मोटरगाडीच्या दरवाजाचे हँडल तुटले आहे. वायकर त्यावेळी मोटरगाडीतच होते, पण त्याना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी वनराई पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासत असून अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp ravindra waikar vehicle met with an accident mumbai print news ssb