निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही तासांतच राजकीय पक्षांमध्ये वादविवाद होण्यास सुरुवात झाली. बुधवारी काँग्रेसचे खासदार संजय निरूपम आणि भाजपाचे स्थानिक नगरसेवक विनोद शेलार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दिंडोशी पोलिसांनी निरूपम यांच्यावर शिवीगाळ करून शेलार यांचा मोबाइल तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर आचारसंहिता भंगाबाबात आयोगाला कळविले आहे.
  बुधवारी सकाळी निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आणि आचारसंहिता लागू झाली. त्याच वेळेस संजय निरूपम हे मालाड येथे एका रस्त्याच्या कामाच्या भूमिपुजनाचा कार्यक्रम करत होते. त्यावेळी शेलार यांनी तेथे जाऊन आक्षेप घेतला. यावेळी शेलार यांनी आपल्या मोबाईलमधून त्याचे चित्रिकरण सुरू केले. त्याचा राग येऊन निरुपम यांनी आपला मोबाईल हिसकावून आपटल्याची तक्रार शेलार यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा