मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा निर्णय; येत्या सात वर्षांत २१० गाडय़ा चालवणार
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी येत्या पाच ते सात वर्षांत दाखल होणाऱ्या २१० वातानुकूलित गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याच्या दृष्टीने अखेर ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’ने (एमआरव्हीसी) चाचपणी सुरू केली आहे. या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे.
येत्या काही वर्षांत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकलच चालवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एमआरव्हीसीकडून एमयूटीपी-२ अंतर्गत ४७ वातानुकूलित लोकल गाडय़ा दाखल केल्या जाणार आहेत. त्यासाठी तीन हजार ४९१ कोटी रुपये खर्च येणार आहे. वातानुकूलित लोकलची बांधणी किंवा खरेदी करण्यापेक्षा त्या भाडेतत्त्वावर घेण्यात याव्यात असे प्रकल्पाला कर्ज पुरवठा करणाऱ्या जागतिक बँकेकडून सुचविण्यात आले होते. मात्र चेन्नईतील रेल्वेच्या आयसीएफने या लोकलची बांधणी करण्यासाठी पुढाकार घेतला व त्यासाठी मंजुरी मागितली. रेल्वे बोर्डाकडून यावर सकारात्मक विचार केला जात असल्याने हा प्रश्न सुटणार आहे. या गाडय़ाही तीन ते चार वर्षांत आणल्या जातील. मात्र त्यानंतर ‘एमयूटीपी-३ ए’अंतर्गत २१० वातानुकूलित गाडय़ाही पाच ते सहा वर्षांत दाखल करण्याचे नियोजन आहे.
एमयूटीपी-३ ए मधील प्रकल्पांची एकूण किंमत ५४ हजार कोटी रुपये असून यामधील वातानुकूलित गाडय़ांच्या प्रकल्पांसाठी १७ हजार ३७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च कमी होऊ शकतो का यासाठी एमआरव्हीसीकडून चाचपणी केली जात आहे. त्यामुळे २१० वातानुकूलित लोकल गाडय़ांची बांधणी किंवा त्या बाहेरून विकत घेण्यापेक्षा भाडेतत्त्वावर घेण्याचा पर्याय शोधला जात आहे. एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस. खुराना यांनी ४७ वातानुकूलित गाडय़ांची बांधणी आयसीएफकडून करण्यासंदर्भात जवळपास निश्चित होत असल्याचे सांगितले. त्यांनतर येणाऱ्या वातानुकूलित लोकल भाडेतत्त्वावर घेण्याचा पर्यायांचा विचार केला जात आहे. त्यासाठी सव्र्हे सुरू असून सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असल्याचे खुराना म्हणाले.
सल्लागार काय करणार?
परदेशात वातानुकूलित रेल्वे गाडय़ा या भाडेतत्त्वावर घेऊन चालवण्यात येत आहेत. त्यामुळे परदेशातील या मॉडेलची माहिती घेतली जाणार आहे. त्यात येणारा खर्च, भाडे आदीचा अभ्यास होईल. त्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून एमआरव्हीसीने निविदाही काढली आहे.