‘महावितरण’च्या वाणिज्य विभागाचे कार्यकारी संचालक अभिजीत देशपांडे आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक उत्तम माने यांची उत्तर हरयाणा विद्युत वितरण कंपनीच्या संचालक मंडळावर अर्धवेळ संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे.
अभिजीत देशपांडे हे १९९७ मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून वीज मंडळात रूजू झाले होते. २००९ पासून त वाणिज्य विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत आहेत. वाणिज्यिक विषयांबरोबरच नियामक आयोगाशी संबंधित कामकाजातील ते तज्ज्ञ मानले जातात. तर उत्तम माने हे २००९ पासून माहिती तंत्रज्ञान विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत.
केंद्र सरकारच्या ‘इंडिया स्मार्ट ग्रीड’ या फोरमचे ते सदस्य आहेत. महाराष्ट्रातील वीजक्षेत्रात सुरू असलेल्या सुधारणांच्या अनुभवाचा लाभ हरयाणाला मिळावा यासाठी ही नियुक्ती झाली आहे.

Story img Loader