महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आणि मनविसे सोडलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये आता आंदोलने व विविध विषय मांडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. कामांची गती वाढविण्याच्या सूचना मनविसेच्या उच्चपदस्थांनी दिल्याने आता पदाधिकाऱ्यांनी मरगळ झटकली आहे. त्यामुळे आता पुढील काही दिवसांत ही स्पर्धा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मनविसेच्या दणक्यामुळे दूरस्थ शिक्षण विभागाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना बंद केलेली शिष्यवृत्ती सवलत पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
मनविसेचे नाराज पदाधिकारी संघटनेतून बाहेर पडल्यावर त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार या संघटनेचे काम सुरू केले. त्यामुळे त्यांची व मनविसेच्या पदाधिकाऱ्यांची आता स्पर्धा सुरू झाली आहे.
मनविसेच्या कार्यकर्त्यांनी दूरस्थ शिक्षण विभागाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याच्या निर्णयाविरोधात आवाज उठविला. ऑनलाइन प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती सवलत बंद झाल्याचे समजले. संचालक डॉ. हरिश्चंद्र यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी केली आहे. शिष्यवृत्ती सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
आंदोलनात उपाध्यक्ष सुधाकर तांबोळी, परशुराम तपासे, नीलेश भोसले आदी सहभागी झाले होते. सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांनाही मुंबई विद्यापीठाच्या मनमानी कारभाराविरोधात निवेदन पाठविण्यात आले आहे.
विशेष प्रतिनिधी, मुंबई

संकेतस्थळे मराठीतून हवीत
मनविसे सोडून गेलेल्या अ‍ॅड. मनोज टेकाडे, अ‍ॅड. अजय तापकीर यांनी प्रहार विद्यार्थी संघटनेमार्फत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांची शुक्रवारी भेट घेतली. राज्यातील विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे आणि हजारो महाविद्यालयांच्या वेबसाइट मराठीतून सुरू करण्याची मागणी प्रहार संघटनेने केली आहे. नॅकच्या मूल्यांकनासाठी महाविद्यालयाचे संकेतस्थळ असणे बंधनकारक आहे. राज्याची राजभाषा मराठी असल्याने संकेतस्थळ मराठीतून असावे. त्यात महाविद्यालयाची संपूर्ण माहिती, दैनंदिन उपक्रम, प्रवेश याद्या, विद्यार्थ्यांची माहिती, लेखापरीक्षण, विद्यार्थ्यांच्या तक्रारी आदी तपशील असावा, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात लवकरात लवकर योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना टोपे यांनी दिल्या आहेत.