महत्वाच्या संस्था आणि बॅंकाच्या कार्यालयांचे ठिकाण म्हणून वांद्रे-कुर्ला संकुलाची (बीकेसी) नवी ओळख निर्माण होत असताना त्या परिसरातून आजूबाजूच्या रेल्वे आणि बस स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगली वाहतूक व्यवस्था उपलब्ध नाही. हिच अडचण लक्षात घेऊन शहर नियोजन समितीने आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) सोबत या परिसरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्याच्या दृष्टीने बोलणी सुरू केली आहे.   
बीकेसीमध्ये लक्झरी वातानुकूलित बस चालवण्याबाबत मागच्या महिन्यात माझी मेट्रोपोलिटन आयुक्त यूपीएस मदन यांच्यासोबत भेट झाली, असं एमएसआरटीसीचे संचालक दीपक कपूर म्हणाले. एमएसआरटीसीचे अधिकारी बीकेसीमध्ये पॉईंट-टू-पॉईंट वॉल्वो बस सुरू करण्याबाबत उत्सुक आहेत. सध्या ते आवश्यक बाबींचा अभ्यास करत असून त्यानंतर किती बसची आवश्यकता आहे याचा निर्णय घेण्यात येईल, असं मदन म्हणाले. यासंदर्भात झालेल्या बैठकीला बीकेसीमधील कॉर्पोरेट कार्यालयांचे प्रतिनिधी देखिल उपस्थित होते, असंही ते म्हणाले.    
येत्या वर्षभरात बीकेसी ते वांद्रे, कुर्ला आणि सायन या स्थानकांदरम्यान एमएमआरडीएसुध्दा बससेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. गर्दीच्या वेळी बेस्ट तर्फे बससेवा पुरवण्यात येते आणि रिक्षाचा देखिल पर्याय उपलब्ध आहे. मात्र रिक्षावाल्यांच्या अरेरावीपणामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.  
एमएमआरडीए याआधी बेस्टबरोबर बोलणी करत होती आणि त्यांनी २० लो-फ्लोअर बस खरेदी करण्याचेही ठरवले होते. बेस्टला यासंदर्भात बोलणी करायला सांगून एमएमआरडीएसोबत मिळून बसची निर्मिती करण्यात यावी आणि या मार्गावर त्याची सेवा सुरू करण्यात यावी असे मूळ नियोजन होते. पण बेस्टने त्याला दाद दिली नाही आणि आता एमएसआरटीएने यामध्ये पुढाकार घेण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या अंतिम होकारासाठी थांबलो असल्याचे मदन म्हणाले.
बीकेसीमध्ये बॅटरीवर धावणा-या बस सुरू करण्याची मदन यांची इच्छा होती. परंतू याबाबतच्या प्राथमिक अहवालात हे शक्य नसल्याचे लक्षात आले. बॅटरीवर चालणा-या बसपेक्षा बॅटरीवर चालणा-या कारची निर्मिती करणे अधिक सोयीचे आहे, पण त्याने सार्वजनिक वाहतुकीला फायदा होणार नाही, असं मदन पुढे म्हणाले.

Story img Loader