मुंबई: एसटी महामंडळातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अखेर बुधवारी वेतन मिळाले. यासाठी महामंडळाने मिळणाऱ्या प्रवासी उत्पन्नातून उर्वरित कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले आहे. या महिन्याचे वेतन पुढील महिन्यात मिळावे यासाठी राज्य शासनाकडे एसटी महामंडळाने आर्थिक मदत मागितली आहे.

हेही वाचा >>>लटके यांचा दोनदा राजीनामा ; राजीनाम्याचा घोळ मर्जीतील उमेदवारासाठी ; भाजपचा आरोप

Bharatiya Janata Party continues to pursue the state government for waiver of penalty on property tax panvel municipal corporation
पनवेल: शास्तीमाफीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
expectations from mahayuti
लेख : नव्या सरकारकडून अपेक्षा
NIACL Recruitment 2024: Notice Out For 500 Assistant Vacancies; Check Salary, Eligibility & More
NIACL Bharti 2024: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ५०० जागांसाठी भरती; ४० हजारांपर्यंत पगार, अर्ज कसा करायचा? जाणून घ्या
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
Devendra Fadnavis Mahayuti
Devendra Fadnavis : महायुतीत मंत्रिपदाचं समीकरण काय? तीन पक्षांमध्ये कोणाला मिळणार संधी? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

राज्य सरकारकडून तुटपुंजा निधी उपलब्ध झाल्याने एसटी महामंडळाच्या राज्यातील सुमारे १० हजार प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर सप्टेंबरचे वेतन ऑक्टोबरची सात तारीख उलटूनही मिळाले नव्हते. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. एसटी महामंडळ चार वर्षात फायद्यात येईल, या अटीवर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी देण्याची जबादारी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या संपकाळात घेतली होती. त्यानुसार दर महिना वेतनासाठी ३६० कोटी रुपये मिळू लागले. मात्र गेल्या तीन महिन्यात ३६० कोटी रुपयांऐवजी महिन्याला १०० कोटी रुपयेच वेतनासाठी शासनाने दिले. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, अखेर बुधवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन झाले.

दरम्यान, एसटीच्या राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्याचे विचाराधीन असल्याची माहिती, एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दिवाळीत एसटी अधिकाऱ्यांना पाच हजार रुपये आणि कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाते.

Story img Loader