‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असलेले एसटी महामंडळ प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून, त्याच्याच एक भाग म्हणून लवकरच एसटी महामंडळाचे मोबाईल अॅप तयार करण्यात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून प्रवासी एसटीच्या विविध गाड्यांचे आरक्षण करू शकतील. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सीट मागे घेण्याची (पुश बॅक) सुविधा असलेल्या ‘हिरकणी’ गाड्या एसटीच्या ताफ्यात शुक्रवारी दाखल झाल्या. त्याचे उदघाटन रावते यांच्या हस्ते मुंबईत झाले.
सध्या एसटी महामंडळाच्या ‘एमएसआरटीसी’ संकेतस्थळावरून गाड्यांचे आरक्षण करता येते. मात्र, अॅप आणल्यावर त्या माध्यमातूनही आरक्षण करता येईल. त्याचबरोबर प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी प्रवाशांना गाडी निघण्यापूर्वीच पॅकिंग केलेले पदार्थ देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. गाडीमध्ये मोबाईल चार्ज करण्याची सुविधाही पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर वातानुकूलित गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे रावते यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा