मुंबई : मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर चार दिवसांत राज्यभरातील ९० पेक्षा जास्त एसटी बसची तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. त्यात एसटीचे ४ कोटींचे नुकसान झाले. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्यातील ३६ आगारे पूर्णपणे बंद होती. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्यात सुरू झालेली जाळपोळ, तोडफोड याचा फटका एसटीला बसला आहे. मराठा आंदोलनामुळे गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील एसटी वाहतूक बंद केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> आशा सेविकांचे १ नोव्हेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन

बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील एसटीची वाहतूक अंशत: बंद आहे. तसेच याच जिल्ह्यातील ३६ आगारातील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. या जिल्ह्यांतील ८५ पेक्षा जास्त एसटी गाड्यांच्या काचा फोडणे, मोडतोड करणे असे प्रकार झाले आहेत. तर ४ एसटी गाड्यां जाळण्यात आल्या आहे. त्यात एसटीचे सुमारे ४ कोटींचे नुकसान झाले. अंशत: आणि पूर्णत: एसटी बससेवा बंद केल्याने, आगारे बंद केल्याने एसटी महामंडळाचा दररोजचा तीन ते साडेतीन कोटींचा महसूल बुडत आहे, अशी माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.