दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीकडून राज्यभरात सुमारे १५ हजार जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. मुंबईतून ४०० तर ठाण्याहून ४६० गाडय़ा सोडल्या जातील. या सर्व बसचे आरक्षण राज्यातील सर्व अधिकृत आरक्षण केंद्रांवर उपलब्ध आहे.  दिवाळीदरम्यान प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन गेल्या वर्षी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यभरातून ९७९० जादा गाडय़ा सोडल्या होत्या. या वर्षी त्यात तब्बल पाच हजार गाडय़ांची भर घालण्यात आली आहे. २५ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर या काळात या गाडय़ा सोडल्या जातील. मुंबईहून ४००, ठाण्याहून ४६०, पालघरहून ४८०, रायगडहून २८०, रत्नागिरीहून ३८० तर सिंधुदुर्गहून ८० जादा गाडय़ांची सोय करण्यात आली आहे. सोलापूरहून ७०० तर  कोल्हापूरहून ४०० जादा तर पुण्याहून ११२० जादा गाडय़ा सोडल्या जातील.

Story img Loader