मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक होत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाला मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि मतदानाचे यंत्र, साहित्य पोहचवण्यासाठी एसटीच्या बस धावणार आहेत. राज्यातील मतदानासाठी एसटीच्या सुमारे ९ हजार बस १९ आणि २० नोव्हेंबर रोजी आरक्षित केल्या आहेत.

राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदानापूर्वी आवश्यक असलेली सर्वच तयारी झाली आहे. मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत पोहचवण्यासाठी एसटी महामंडळाकडे साध्या बसची मागणी करण्यात आली. यासाठी सुमारे ९ हजार २०० एसटी बसचे आरक्षण करण्यात आले आहे. एसटी महामंडळाने ३१ विभागांतून २०० ते ६०० बस आरक्षित केल्या आहेत. पुणे विभागातून सर्वाधिक एसटीची मागणी असून सुमारे ६०० बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ नाशिकमधून सुमारे ५००, सोलापूर ४९०, अहमदनगर ४६८, सातारा ४४९, कोल्हापूरमधून ४५३ बसची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या कामासाठी राज्यभरात एसटी महामंडळाच्या सुमारे ९ हजारांहून अधिक बसगाड्या वापरण्यात येणार आहेत. यातून एसटी महामंडळाला दोन दिवसांसाठी प्रत्येक बसमागे २४ ते ३० हजार रुपये मिळतील, असे एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
2160 BEST buses scrapped in five years Mumbai print news
पाच वर्षांत बेस्टच्या २१६० बस भंगारात, केवळ ३७ नव्या बसची खरेदी
best initiative self owned buses gradually decreased leased buses increasing
भाडेतत्वावरील बसमुळे ‘बेस्ट’ धोक्यात; बसच्या देखभाल-दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह
Kurla bus accident, Death toll in Kurla bus accident,
कुर्ला बस अपघातातील मृतांची संख्या सात
Devendra Fadnavis Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर
NMMT changed one route from Juhu village on Vashi Koparkhairane due to heavy traffic
प्रवासी नसलेल्या बस थांब्यासाठी वळसा, एनएमएमटीच्या नाहक मार्गबदलाने वेळेचा अपव्यय

हेही वाचा >>> मुंबई महापालिकेतील अभियंत्यांची भरती आता निवडणुकीनंतर; २६ नोव्हेंबरनंतर अर्ज भरण्याचा कालावधी

निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि निवडणुकीच्या दिवशी एसटी बस आरक्षित केल्या असल्याने राज्यातील ग्रामीण भागात एसटी बस फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रवाशांना खासगी वाहनांचा पर्याय स्वीकारावा लागेल.

छत्रपती संभाजीनगर (३७४ बस), बीड (२९३), जालना (१९९), लातूर (१७५), नांदेड (२७८), धाराशिव (१८२), परभणी (१७५), मुंबई (२८०), पालघर (२५०), रायगड (२३७), सिंधुदुर्ग (१२६), ठाणे (२४६), नागपूर (२५०), भंडारा (२१९), चंद्रपूर (२१४), गडचिरोली (१०९), वर्धा १०८), बुलडाणा (२६८), यवतमाळ (२६५), अमरावती (२८१), जळगाव (३८९), धुळे (३१८) येथेही मोठ्या प्रमाणात बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनेक विभागात उपलब्ध असलेल्या स्वमालकीच्या बसपेक्षा अधिक बस आरक्षित केल्या आहेत. त्यामुळे इतर विभागांतून बस मागवून बसची पूर्तता केली जाणार आहे.

Story img Loader