राज्यातील २ लाख ८५ हजार १९३ विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेशांची एमटी सीईटी ही परीक्षा गुरुवारी राज्यभरात पार पडणार आहे.
ही परीक्षा गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे.सकाळी १० ते ११.३० या वेळेत रसायनशास्त्राचा पेपर होईल. त्यानंतर जीवशास्त्राचा पेपर दुपारी १२ ते १.३० आणि गणिताचा पेपर दुपारी ३ ते ४.३० या वेळेत होईल.
आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आतापर्यंत एमएचटी-सीईटी ही एकच सामायिक परीक्षा होत होती. वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश आगामी वर्षांपासून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेतून (नीट) होतील. त्यामुळे ही परीक्षा यंदा केवळ अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र या विषयांच्या प्रवेशासाठीच होईल.

Story img Loader