रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबांनी यांनी नुकतीच केलेली कारखरेदी सामान्यांचे डोळे विस्फारणारी ठरली आहे. अंबांनी यांनी गेल्याच आठवड्यात तब्बल ८.५ कोटी रूपयांना बीएमडब्ल्यूची लीमोझीन ही कार खरेदी केली. स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी जगभरातील आघाडीचे उद्योगपती या गाडीला पसंती देतात. जगातील फारच थोड्या जणांकडे ही गाडी असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे. त्यामुळे मुकेश अंबांनी आता या मोजक्या लोकांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत.
या गाडीच्या नोंदणी शुल्काचा आकडा आणि अन्य तपशील पाहता ही गाडी सध्या मुंबईत असलेल्या महागड्या गाड्यांपैकी असल्याचे सांगण्यात येत आहे. ७ मे रोजी ताडदेव आरटीओ येथे नोंदणी करण्यात आलेल्या या बीएमडब्ल्यूच्या नोंदणीपोटी अंबानी यांनी तब्बल १ कोटी ६८ लाखांचं शुल्क भरले. याशिवाय कारच्या बीएस या सीरिजमधील व्हीआयपी क्रमांकासाठी अतिरिक्त २ लाख १० हजार रुपये मोजण्यात आले आहेत.
अंबांनी यांच्या सुरक्षेच्या गरजेनुसार जर्मनी येथे ही बीएमडब्ल्यू ७६० एलआयची निर्मिती करण्यात आली. अंबांनी यांच्या झेड दर्जाच्या सुरक्षेच्या विचार करता संपूर्ण गाडीवर बुलेटप्रुफ आवरण चढविण्यात आलेले आहे. या गाडीमध्ये अंतर्गत इंटरनेट, वायफाय आणि प्रकाशाच्या गरजेनुसार बदलणाऱ्या एलईडी लाईटसचा समावेश आहे. याशिवाय, गाडीच्या वरच्या आणि दोन्ही बाजुंना कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani buys bmw limousine at rs 8 5 crore