देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेली ‘अँटिलिया’ इमारत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या दाव्यानुसार अँटिलिया इमारत एका अनाथलायाच्या जागेवर बांधण्यात आली असूव ही जमीन अंबानी यांना विकण्यात आली. जमिनीचा हा व्यवहारच बेकायदा असल्याचा दावा वक्फ बोर्डाने मुंबई हायकोर्टात केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई हायकोर्टात वक्फ बोर्डाने प्रतिज्ञापत्र सादर केले असून यात सीईओंनी अँटिलिया इमारतीच्या जागेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ९ मार्च २००५ रोजी वक्फ बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष आणि सीईओंकडून जमीनीच्या विक्रीला देण्यात आलेली मंजूरी बेकायदा होती, असे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यापूर्वी २१ जुलै २०१७ रोजी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर यांच्या खंडपीठाने धर्मादाय आयुक्तांच्या भूमिकेवर घेतलेल्या आक्षेपाबद्दल वक्फ बोर्डाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले होते.

अंबानींच्या ‘अँटिलिया’ इमारतीवर कारवाईचे संकेत

अल्पसंख्याक विभागाचे संयुक्त सचिव आणि महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे सीईओ संदेश तडवी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अँटिलियाची जमीन करीबभाई इब्राहिम खोजा अनाथालयाच्या मालकीची होती. अनाथालयाच्या ट्रस्टकडून अँटिलिया कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने ही जमीन त्यावेळी अवघ्या २१.०५ कोटी रूपयांना विकत घेतली होती. त्यावेळच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत ५० कोटी इतकी होती. याशिवाय, खरेदी व्यवहारासाठी वक्फ बोर्डाच्या मंजूरीची गरज होती. त्यासाठी वक्फ बोर्डाच्या दोन तृतीयांश सभासदांनी याला अनुमती देणे गरजेचे होते. मात्र, या नियमांचे पूर्णपणे उल्लंघन झाल्याचे वक्फ बोर्डाचे म्हणणे आहे. ७ डिसेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल.

अंबानींच्या घरासमोर ‘त्यांनी’ घेतले चक्क १२५ कोटींचं घर

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani luxurious house antilia build on illegal land maharashtra waqf board claim