मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे ललित लेखनाबद्दल देण्यात येणारा विद्याधर गोखले स्मृती पुरस्कार ‘लोकसत्ता’च्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक मुकुंद संगोराम यांना घोषित झाला आहे. त्याचबरोबर दै ‘सामना’चे योगेश त्रिवेदी यांची नवसंदेशकार रमेश भोगटे स्मृती पुरस्कारासाठी, दै. ‘पुण्यनगरी’चे रमेश औताडे यांची कॉ. सरमळकर स्मृती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.पत्रकार दिनानिमित्त येत्या ७ जानेवारी रोजी मुंबई मराठी पत्रकार भवनात आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष समारंभात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.   

Story img Loader