मुंबई : मुलुंड आणि ठाण्यातील काही भागांतील नागरिकांना २० जानेवारीपासून पुढचे काही दिवस शुद्धीकरण प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून जल शुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या भूमिगत जलबोगद्याला ठाणे विभागात कूपनलिकेचे काम सुरू असताना हानी झाली आहे. या जलबोगद्याची दुरुस्ती शुक्रवारपासून हाती घेण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातून जलबोगद्याद्वारे मुंबईत आणले जाणारे पाणी आधी भांडुप येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात नेले जाते. मात्र, जल शुद्धीकरणासाठी पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या भूमिगत जलबोगद्याला ठाणे विभागात कूपनलिकेचे काम सुरू असताना हानी झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी शुक्रवार, २० जानेवारीपासून हा जलबोगदा बंद करावा लागणार आहे. या कारणास्तव भांडुप संकुलापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जुन्या वितरण व्यवस्थेचा वापर करण्यात येणार आहे.

हेही वाचा – “मुंबई आणि महाराष्ट्रात राहायचं असेल तर…”, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

हेही वाचा – मुंबई : ४५ गुंतवणुकदारांची तब्बल १६ कोटी रुपयांची फसवणूक, आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केला गुन्हा

या भागात शुद्धीकरण प्रक्रियेशिवाय पाणीपुरवठा

मुलुंडमधील वीणा नगर, वैशाली नगर, स्वप्ननगरी, योगी हिल्स, तसेच मुलुंड पश्चिम विभागातील तांबे नगर चेकनाका व ठाणे येथील किसन नगर या परिसरात शुक्रवार, २० जानेवारी २०२३ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत प्रक्रियेशिवाय पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे, मुलुंड पश्चिम येथील नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कृपया पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.