बावन्नाव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने सादर केलेल्या, प्रसाद भिडे दिग्दर्शित ‘एका गुराख्याचे महाकाव्य’ या नाटकाने तीन लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार पटकावित अन्य पुरस्कारांमध्ये बाजी मारली आहे. अंतिम फेरीतून निवड करण्यात आलेल्या नाटकांची आणि नाटय़संस्थांची नावे राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने शनिवारी संध्याकाळी जाहीर केली आहेत.
या स्पर्धेतील दोन लाख रुपयांचे द्वितीय पारितोषिक नाशिकच्या आर. एम. ग्रुपच्या ‘गोदो वन्स अगेन’ या नाटकाला मिळाले आहे. एक लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक रोहा येथील स्पंदन नाटय़ कला-क्रीडा-शैक्षणिक मंडळाने ‘वाळू..’ या नाटकासाठी पटकाविले.
सवरेत्कृष्ट नाटकाचे पहिले पारितोषिक मिळविण्याबरोबरच ‘एका गुराख्याचे महाकाव्य’ याच नाटकाच्या दिग्दर्शनासाठी प्रसाद भिडे यांनी ५० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक तर ‘गोदो वन्स अगेन’चे दिग्दर्शक प्रशांत हिरे यांनी ४० हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक पटकाविले. तीस हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक पटकाविण्याचा मान ‘वाळू..’ या नाटकाचे दिग्दर्शक सुधीर पवार यांनी मिळविला.
सवरेत्कृष्ट ठरलेल्या नाटकांच्या व्यतिरिक्त रंगभूषा विभागातील तृतीय पारितोषिक ‘अर्यमा उवाच’ नाटकासाठी प्रदीप गोवेकर (पाच हजार रुपये) यांनी मिळविले.  

Story img Loader