मुलुंडमध्ये एका ४० वर्षीय महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी रविवारी पाच आरोपींना अटक केली आहे. भोईवाडा सत्र न्यायालयाने त्यांना ३० सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शक्ती मिलमधील सामूहिक बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच शनिवारी मुंलुडमध्ये आणखी एका सामूहिक बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले. कचरा वेचणाऱ्या या महिलेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके स्थापन केली होती. त्यानुसार या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून आणखी काही आरोपींचा शोध घेतला जात आहे. वाहिद कय्यूम खान, अजय बेचंद, दस्तगीर खान, वसीम शेख आणि महेश अशी आरोपींची नावे असून त्यांना पोलीस कोठडी मिळाल्याने उर्वरित आरोपींचाही छडा लागेल असे पोलिसांनी सांगितले.

Story img Loader