मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी ब्लाॅक घेण्यात आला आहे. तर, शनिवारी मध्यरात्री १२ पासून ते सकाळी १० पर्यंत १० तासांचा मोठा ब्लाॅक पश्चिम रेल्वेवर असेल. त्यामुळे रविवारी लोकल विलंबाने धावण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मध्य रेल्वे

मुख्य मार्गिका

कुठे : ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल सेवा मुलुंड – कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या लोकल ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकावर थांबतील. तर, ठाकुर्ली, कोपर या स्थानकांत लोकल थांबणार नाही.

हेही वाचा – मुंबई : हिरे व्यापाऱ्याच्या गाडीच्या धडकेत कामगाराचा मृत्यू, सागरी किनारा रस्त्यावरील घटना

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी – पनवेल / बेलापूर / वाशी अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – कुर्ला आणि पनवेल – वाशी या भागांवर विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

हेही वाचा – मतदान केंद्रांच्या संख्येत वाढ, विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत १० हजार १११ मतदान केंद्रे, प्रत्येक केंद्रावर सरासरी १२०० मतदार

पश्चिम रेल्वे

कुठे : गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवार मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सर्व अप धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर धावतील. तसेच डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल अंधेरी येथून डाऊन जलद मार्गावर धावतील. या लोकल गोरेगाव स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर नेण्यात येतील. गोरेगाव – बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल पाचव्या मार्गिकेवरून धावतील. या लोकल राम मंदिर, मालाड, कांदिवली या स्थानकांवर थांबणार नाहीत. पहाटे ४.३० नंतर अंधेरी – विरारदरम्यान धावणाऱ्या डाऊन जलद लोकल ब्लाॅक कालावधी पूर्ण होईपर्यंत डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच चर्चगेट – बोरिवली मार्गावरील काही धीम्या लोकल गोरेगावपर्यंत अंशत: रद्द करून गोरेगाववरून चर्चगेटकडे मार्गस्थ होतील. काही लोकल रद्द करण्यात येतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai 10 hour block on western railway mega block on central railway on sunday mumbai print news ssb