मुंबई : मालाड पश्चिमेतील मालवणी येथील धार्मिक शैक्षणिक संस्थेत शनिवारी रात्री १० वर्षीय मुलाने आत्महत्या केली. कारण स्पष्ट झाले नसल्याचे मालवणी पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कोणतीही घातपाताची शक्यता नसून मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
हेही वाचा – खासदार रवींद्र वायकर यांच्या मोटरगाडीला अपघात
हेही वाचा – मुंबई : कारवाई केल्याच्या रागातून पोलिसावर हल्ला
मृत मुलाचे कुटुंबीय मालवणी परिसरात राहतात. धार्मिक शिक्षणासाठी मुलगा मदरशामध्ये राहत होता. तसेच, सुट्टीच्या दिवशी कुटुंबीयांसोबत घरी राहायला यायचा. याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबीयांकडे केलेल्या चौकशीत अधिक माहिती हाती लागली नाही. शनिवारी सकाळी या मुलाच्या पालकांनी त्याला नेहमीप्रमाणे मदरशात सोडले. रात्री इतर मुले खेळण्यासाठी बाहेर गेली असता त्या मुलाने गळफास लावून घेतला. त्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. कुटुंबीयांपासून दूर राहावे लागत असल्यामुळे त्याने आत्महत्या केली का, याबाबत पोलीस तपास करत आहेत.