मुंबई : मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावीची केंद्रीय प्रवेशाची दुसरी प्रवेश यादी १० जुलै रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली. पहिल्या प्रवेश यादीच्या प्रवेश पात्रता गुणांच्या तुलनेत दुसऱ्या प्रवेश यादीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये किंचितशी घट झालेली आहे. मात्र, दुसऱ्या प्रवेश यादीअंतर्गचे प्रवेश पात्रता गुणही नव्वदीपार गेले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठीची चुरस अधिकच वाढत जाणार आहे. मुंबई महानगरक्षेत्रातील विविध महाविद्यालयांतील १ लाख ९३ हजार ७९२ जागांसाठी १ लाख ७५ हजार ८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी ७३ हजार ४३८ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. तर, २० हजार ३० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे, १३ हजार ४६९ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीक्रमाचे आणि १० हजार ३८८ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले आहे.

दुसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १० जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करायचा आहे. मुंबई महानगरक्षेत्रातील विविध महाविद्यालयात कला शाखेच्या २८ हजार २३८ जागा उपलब्ध असून ६ हजार १२४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. तसेच वाणिज्य शाखेच्या १ लाख २ हजार २२ जागा उपलब्ध असून ४३ हजार ३६७ विद्यार्थ्यांना महाविद्यालय, विज्ञान शाखेच्या ६० हजार ७३२ जागा उपलब्ध असून २३ हजार ५३३ विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमासाठी २ हजार ८०० जागा उपलब्ध असून ४१४ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले आहे.

हेही वाचा…मुंबईत झाडावर चढून चित्रपट निर्मात्याचं आंदोलन; मराठी चित्रपटसृष्टीचा उल्लेख करत केली ‘ही’ मागणी

Girl Student suicide hostel Chembur, suicide Chembur,
मुंबई : चेंबूरमधील शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीची आत्महत्या
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Pharmacy, management courses hit , Pharmacy,
प्रवेश प्रक्रियेला विलंब झाल्याने औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन अभ्यासक्रमांना फटका
11th Admission, seats vacant, Mumbai, loksatta news,
अकरावी प्रवेश : दैनंदिन गुणवत्ता फेरीअंती जवळपास १ लाख ३४ हजार जागा रिक्त, द्विलक्षी विषयासाठी ७ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश
CET, new colleges in third round, CET news,
तिसऱ्या फेरीत नव्या महाविद्यालयांतील जागांचा समावेश ? सीईटी कक्षाचे संकेत; दुसऱ्या फेरीला ६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
girls admission vocational courses, girls Maharashtra admission,
राज्यातील १ लाख ३९ हजार मुलींनी घेतला व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश, ‘या’ अभ्यासक्रमांना सर्वाधिक पसंती
students poisoned school Kalwa, Thane,
ठाणे : कळव्यामधील एका शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा
no decision from maha government on mahajyoti withdraw from uniform policy process
‘समान धोरण’मुळे लाखो विद्यार्थी वंचित; ‘महाज्योती’ बाहेर पडल्यानंतर सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

प्रवेश निश्चित कसा करायचा?

कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे केले जात आहेत. १० जुलै रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉगिनमध्ये जाऊन ‘चेक अलॉटमेंट स्टेटस’ या पर्यायावर क्लिक करून कोणते महाविद्यालय मिळाले, हे पाहता येईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा असल्यास ‘अपलोड रिक्वॉयर्ड डॉक्युमेंट्स’ या पर्यायावर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावीत आणि ‘प्रोसिड फॉर ऍडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून संबंधित महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करावा. विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले असल्यास प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. जर पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला, तर विद्यार्थ्यांना पुढील एका फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार २ ते १० क्रमांकामधील कोणतेही कनिष्ठ महाविद्यालय मिळाले असेल आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश हवा असल्यास वेळापत्रकात नमूद केलेल्या कालावधीत आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा, अन्यथा पुढील प्रवेश प्रक्रियेच्या https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या सूचनांनुसार कार्यवाही करावी. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या प्रवेश यादीमध्ये कनिष्ठ महाविद्यालय अलॉट झाले नसेल, अशा विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत मिळालेले गुण व संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेश पात्रता गुण तपासून पहावेत आणि त्या अनुषंगाने तिसऱ्या नियमित फेरीसाठी महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरून लॉक करावा.

नियमित फेरी २ अंतर्गत संस्थात्मक, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन या कोटांतर्गतच्या प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांची प्रवेश यादी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रसिद्ध केली गेली. तसेच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कोटांतर्गत प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून दूरध्वनीवरून संपर्क साधला जाणार आहे. या विद्यार्थ्यांना १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत कोटांतर्गत प्रवेश निश्चित करावे लागतील. दरम्यान, विद्यार्थ्याने केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, संस्थात्मक, अल्पसंख्यांक आणि व्यवस्थापन यापैकी कोणत्याही कोटांतर्गत एकदा प्रवेश निश्चित केल्यास तो पुढील सर्व फेऱ्यांसाठी प्रतिबंधित केला जातो.

हेही वाचा…मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात खळबळ, झाडावर चढून चित्रपट निर्मात्याचं आंदोलन

दुसऱ्या प्रवेश यादीचे प्रवेश पात्रता गुणही नव्वदीपार

(पहिल्या प्रवेश यादीचे प्रवेश पात्रता गुण कंसात)

दुसऱ्या प्रवेश यादीअंतर्गत चर्चगेट येथील एच.आर. महाविद्यालयांत वाणिज्य शाखेसाठी ९२.४ टक्के (९३.०० टक्के), के. सी. महाविद्यालयांत कला शाखेसाठी ८५.०० टक्के (८६.००टक्के), वाणिज्य शाखेसाठी ९१.२ टक्के (९१.४ टक्के) आणि विज्ञान शाखेसाठी ८६.४ टक्के (८७.६ टक्के), जय हिंद महाविद्यालयांत कला शाखेसाठी ८९.२ टक्के (८९.६ टक्के), वाणिज्य शाखेसाठी ९१.२ (९१.६) टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८७.४ (८८.८ टक्के), फोर्ट येथील सेंट झेविअर्स महाविद्यालयांत कला शाखेसाठी ९२.८ टक्के (९३.५ टक्के), वाणिज्य शाखेसाठी ८८.०० टक्के (८९.२ टक्के) आणि विज्ञान शाखेसाठी (८९.६ टक्के) ९१.६ टक्के, माटुंग्यातील रुईया महाविद्यालयांत कला शाखेसाठी ९१.६ टक्के (९२.२ टक्के) आणि विज्ञान शाखेसाठी ९२.४ टक्के (९३.४ टक्के), पोदार महाविद्यालयांत वाणिज्य शाखेसाठी ९४.२ टक्के (९४.४ टक्के), रुपारेल महाविद्यालयांत कला शाखेसाठी ८४.८ टक्के (८५.८ टक्के), वाणिज्य शाखेसाठी ९०.३ टक्के (९०.६ टक्के) आणि विज्ञान शाखेसाठी ९०.८ टक्के (९१.८ टक्के), विले पार्ले येथील साठ्ये महाविद्यालयांत कला शाखेसाठी ७८.६ टक्के (८१.०० टक्के), वाणिज्य शाखेसाठी ८८.८ टक्के (८९.२ टक्के) आणि विज्ञान शाखेसाठी ८९.६ टक्के (९०.६ टक्के), डहाणूकर महाविद्यालयांत वाणिज्य शाखेसाठी ९०.४ टक्के (९०.८ टक्के), मिठीबाई महाविद्यालयांत कला शाखेसाठी ८८.०० टक्के (८६.८ टक्के), वाणिज्य शाखेसाठी ९०.४ टक्के (९१.०० टक्के) आणि विज्ञान शाखेसाठी ८८.२ टक्के (८९.४ टक्के), एन. एम. महाविद्यालयांत वाणिज्य शाखेसाठी ९२.२ टक्के (९३.४ टक्के) प्रवेश पात्रता गुण असतील.