मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे ५ ऑक्टोबरपासून वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. या नवीन वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)वरून अप आणि डाऊन २० जलद लोकल फेऱ्या दादरवरून धावणार आहेत. सीएसएमटी, दादर स्थानकातील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी सीएसएमटीवरील २० अप आणि डाऊन लोकल दादरवरून धावतील.

करोना, टाळेबंदी काळानंतर मध्य रेल्वेवरील लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गर्दीचा भार सर्व लोकल फेऱ्यांवर पडत आहे. परिणामी दररोज अत्यंत गर्दीतून धक्के खात प्रवास करावा लागतो. लोकलमध्ये बसण्यास जागा मिळावी यासाठी दादर, भायखळ्यावरून सीएसएमटी गाठून प्रवासी पुन्हा कल्याण दिशेकडील प्रवास करतात. सीएसएमटीवरून २५४ जलद लोकल धावतात. त्यातील अनेक लोकल पुरेसे फलाट नसल्याने उशीरा धावतात. तसेच सिग्नलमुळे सीएसएमटी-दादर दरम्यान अनेक लोकल बराचवेळ उभ्या असतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी २० जलद लोकल सीएसएमटीऐवजी दादरवरून धावणार आहेत. त्यामुळे लोकलचा वक्तशीरपणा सुधारण्यास हातभार लागेल. तसेच दादर येथील गर्दी विभाजित करण्यास मदत होईल, असा विश्वास रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.

changes in traffic route due to inauguration of underground pune metro route
मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त वाहतूक बदल, शिवाजीनगर-स्वारगेट भूमिगत मार्गिकेचे उद्या उद्घाटन
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Uday Samant expressed said work of Mumbai Goa National Highway will be completed by next December
मुंबई गोवा महामार्ग येत्या डिसेंबरमध्ये पुर्ण होणार, उद्योगमंत्री उदय सामंत
Distribution sweets Badlapur station, Akshay Shinde encounter,
ज्या स्थानकात आंदोलन, तिथेच आनंदोत्सव; अक्षय शिंदे चकमकीनंतर बदलापूर स्थानकात पेढे वाटप
Mumbai, block on Western Railway, mega-block,
मुंबई : पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक
Central Railway run 22 extra night trains for Ganeshotsav between CST and Thane Kalyan
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त लोकलच्या २२ जादा फेऱ्या
Extension service time Metro 1, Metro 1,
‘मेट्रो १’च्या सेवा कालावधीत ७ आणि १७ सप्टेंबर रोजी वाढ
Mumbai-Kolkata national highway, Flyover,
भोंगळ कारभार! मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूल दुभंगला…

हेही वाचा – मुंबई : गोखले पुलावरील आडवे खांब हटणार, अवजड वाहने जाऊ शकणार ?

मध्य रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकांपैकी एक दादर हे स्थानक आहे. दादर स्थानकावरून सुमारे तीन लाखांहून अधिक प्रवाशांचा प्रवास होतो. तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेला दादर स्थानक जोडलेले असल्याने प्रवासी दादर येथून गाड्या बदलतात. तसेच दादर हे टर्मिनस आहे. त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांसाठी प्रवासी दादर स्थानक गाठतात. प्रवाशांच्या गर्दीचे व्यवस्थापन करताना रेल्वे सुरक्षा विभागाची तारेवरची कसरत सुरू असते. आता दादर फलाट क्रमांक ८ चे रुंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. तर, फलाट क्रमांक १०-११ चे ‘डबल डिस्चार्ज’ फलाटात रुपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकलच्या पूर्व-पश्चिम दोन्ही बाजूने चढता-उतरता येणार आहे. आता पुढील पाऊल उचलून दादर येथून जलद लोकल सोडण्यात येणार आहेत. नवे वेळापत्रक ५ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातून १० अप आणि १० डाऊन लोकल फेऱ्या धावतील. या बदलामुळे सध्याच्या लोकलला होणारा विलंब टाळता येणे शक्य होणार आहे.

हेही वाचा – मुंबई : रेल्वे रुळांवर पाणी का साचले ? पालिका प्रशासनाचे विचार मंथन

एकूण लोकल फेऱ्या – १,८१० फेऱ्या

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर एकूण जलद लोकल – २७० फेऱ्या

यामधील १५ डबा जलद लोकल – २२ फेऱ्या

यामधील १२ डबा जलद लोकल – २४८ फेऱ्या