मुंबई : सिंधुदुर्गातील महाविद्यालयाचे विश्वस्त असल्याचा दावा करून महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली ४५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी चौघांना अटक केली असून आरोपींनी विश्वास संपादन करण्यासाठी स्वतःला सिंधुदुर्गातील मोठ्या नेत्याचे नातेवाईक असल्याचे भासवले होते.

अंधेरी येथील ५१ वर्षीय पीडित महिला खासगी रुग्णालयात वैद्यकीय सहाय्यक म्हणून काम करतात. त्यांच्या मुलीने ऑक्टोबर २०२० मध्ये नीट परीक्षेत ३१५ गुण मिळवले होते. ती सध्या बंगळुरूमध्ये बीएचएमएसच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तक्रारीनुसार, मार्च २०२१ मध्ये मुलीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी प्रयत्न करत असताना तक्रारदार महिलेची भेट तिची जुनी मैत्रिणी मेघना सातपुते हिच्याशी झाली. सातपुतेने तक्रारदार महिलेला आणि तिच्या मुलीला तिच्या परिचीत व्यक्तींच्या मदतीने प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर १४ मार्च २०२१ रोजी सातपुतेने वर्सोव्याच्या सात बंगला येथील एका हॉटेलमध्ये तक्रारदार महिलेची भेट घेतली. तेथे ती स्वतः आणि नितेश पवार व राकेश गवडे हे सिंधुदुर्गातील एका वैद्यकीय महाविद्यालयाचे विश्वस्त असल्याचे सांगितले. त्यांनी तक्रारदार महिलेच्या मुलीला व्यवस्थापन कोट्यातून महाविद्यालयात प्रवेश देण्याचे आमिष दाखवले आणि त्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी केली.

Janshatabdi Tejas and Mangaluru Express will run only till Thane and Dadar
कोकणातील तीन रेल्वेगाड्या ठाणे, दादरपर्यंत धावणार
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Dadar Ratnagiri passenger closed and during that time Dadar Gorakhpur train
दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करून गोरखपूरला नवी गाडी
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Bombil , Saranga, low visibility , fish price ,
कमी दृश्यमानतेमुळे मासळीही दिसेनाशी; यंदाच्या वर्षी सरंगा, बोंबिलाच्या दरात ७० टक्क्यांनी वाढ
ED arrested two suspecte for 1200 crores in case of financial misappropriation
मालेगाव बँक खात्यांद्वारे कोट्यावधींचे गैरव्यवहार प्रकरण : दुबईला पळण्याच्या तयारीत दोघांना गुजरात विमानतळावरून अटक
police employee threatened and extorted shopkeepers in Azad Maidan area
बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याची दुकानदारांना धमकावत वसुलीआरोपी अटकेत
mumbai pune express way link road at lonavala
Pune-Mumbai Express Way: पुणे ते मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार, ‘या’ रस्त्याचं काम ९० टक्के पूर्ण; नवी मुंबई विमानतळ आणखी वेगात गाठता येणार!

हेही वाचा…Pune-Mumbai Express Way: पुणे ते मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार, ‘या’ रस्त्याचं काम ९० टक्के पूर्ण; नवी मुंबई विमानतळ आणखी वेगात गाठता येणार!

ती रक्कम देण्यासाठी तक्रारदार महिला तयार झाली. पण त्यानंतरही तक्रारदार महिलेच्या मुलीला प्रवेश मिळाली नाही. करोनामुळे टाळेबंदी असताना सर्व नियम बदल्यामुळे प्रवेशासाठी आता लाख रुपये लागतील, असे आरोपींनी सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सातपुते व पवार यांनी तक्रारदार महिलेला सावंत काकांची ओळख करून दिली. त्यांनी स्वतःला सिंधुदुर्गातील एका मोठ्या नेत्याचे जवळचे नातेवाईक व विश्वस्त असल्याचे सांगितले.

हेही वाचा…शहरी नक्षलवाद प्रकरण : प्रा. आनंद तेलतुंबडे यांची दोषमुक्तीसाठी उच्च न्यायालयात याचिका

आरोपींनी तक्रारदार महिलेला गुणवत्ता यादी दाखवून त्यांच्या मुलीचा प्रवेश निश्चित असल्याचेही सांगितले. त्यानंतर तक्रारदार महिलेने पैसे जमवून इलेक्ट्रॉनिक बँक व्यवहार आणि रोख स्वरूपात दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत आरोपींना एकूण ४५ लाख रुपये दिले. डिसेंबर २०२१ मध्ये महाविद्यालय सुरू होईल. मात्र, त्यांनी कोणतेही कागदपत्रे किंवा प्रवेश पत्र दिले नाहीत. म्हणून तक्रारदार महिलेला संशय आला आणि तिने वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांच्या मुलीला महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसल्याचे समजले. त्यावेळेपासून तक्रारदार महिला आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. मात्र सर्वांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली. वर्सोवा पोलिसांनी मेघना सातपुते, नितेश पवार, राकेश गवडे आणि सावंत काका नावाच्या व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Story img Loader