मुंबईच्या वांद्रे परिसरातील बेहरामपाडा येथे गुरूवारी दुपारी झोपडी कोसळल्याची दुर्घटना घडली. हा परिसर झोपडपट्टीचा असून याठिकाणी स्थानिकांकडून अनेक मजल्यांच्या झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. यापैकी एक पाचमजली झोपडी दुपारी दीडच्या सुमारास कोसळली. यामध्ये चार जण मृत्युमुखी पडले आहेत, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आयशा अबरार खान (१२) , अली निसार अहमद खान (३) , ओसामा निसार खान (१४) यांच्यासह अफिफा सदाफ या एका वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तर जखमींमध्ये दौलत शेख, झुल्फीकार, साकिया या तिघांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी नजीकच्या भाभा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली आणखी एक मुलगी अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी अग्निशामन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.

Story img Loader