मुंबई : निर्जनस्थळी नेऊन ९ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी रविवारी अटक केली. पीडित मुलीने आरडाओरडा केला असता आरोपीने तिला गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडित मुलगी रविवारी तिच्या मैत्रिणीच्या घरी जात होती. त्यावेळी आरोपीने तिला पकडून शेजारी असलेल्या जंगल परिसरात नेले. आरोपीने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. त्यावेळी तिने आरडाओरडा केला असता आरोपीने तिला गळा दाबून ठार मारण्याची धमकी दिली. पीडित मुलगी घाबरली. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी विनयभंग व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी राहत असलेल्या परिसरा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याचा गुन्ह्यांत सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला याप्रकरणी अटक केली.