मुंबई : वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या प्रेयसीची प्रियकराने हत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी आरोपीला अटक केली. ते दोघेही मुळचे नेपाळमधील रहिवाशी असून क्षुल्लक वादातून ही हत्या झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमकुमारी मोतीराम भट ऊर्फ शानू असे या प्रेयसीचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकर डांबरबहादूर खडके विश्‍वकर्मा (३०) याला पोलिसांनी अटक केली. शानू मूळची नेपाळमधील रहिवासी असून ती कांदिवलीतील अशोकनगर परिसरात घरकाम करीत होती. तिथेच डांबरबहादूर सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. तोदेखील मुळचा नेपाळमधील रहिवाशी आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची समाजमाध्यमावर ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. गेल्या सहा महिन्यांपासून ते दोघेही रिलेशनशीपमध्ये होते. १४ एप्रिल रोजी शानूचा वाढदिवस होता. तिला तिचा वाढदिवस डांबरबहादूरसोबत साजरा करायचा होता. त्यामुळे शनिवार, १३ एप्रिल रोजी सायंकाळी ती त्याच्या घरी राहण्यासाठी आली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्याची आई घरी होती. या दोघांनी रात्री वाढदिवस साजरा करून मद्यप्राशन केले. यावेळी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. राग अनावर झाल्याने डांबरबहादूरने शानूला जोरात भिंतीवर आदळले. त्यावेळी ती जागीच कोसळली.

हेही वाचा – महत्त्वाचे : मुंबई विमानतळावर ९ मे ला टेकऑफ – लँडिंग तब्बल सहा तास बंद रहाणार, वाचा सविस्तर…

हेही वाचा – मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल

बेशुद्धावस्थेत असलेल्या शानूला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून डांबरबहादूरचा शोध सुरू केला होता. या शोध मोहिमेदरम्यान पोलिसांनी काही तासांत डांबरबहादूरला अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai a 30 year old man was arrested in connection with the murder of his girlfriend mumbai print news ssb