मुंबईः मालाड येथील हॉटेलमध्ये ग्राहकाने मागविलेल्या कोल्ड कॉफीमध्ये झुरळ सापडल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली असून याप्रकरणी मालाड पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – खारमध्ये एका व्यक्तीला बेकायदेशिररित्या ताब्यात घेतल्याप्रकरणी चार पोलीस निलंबित
हेही वाचा – गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाचा खर्च अडीचशे कोटींनी वाढला
अंधेरीमध्ये वास्तव्यास असलेले तक्रारदार प्रतिक रावत (२५) मालाड इन्फिनिटी मॉल परिसरातील एका रेस्टॉरन्टमध्ये शुक्रवारी रात्री मित्रासोबत कोल्ड कॉफी पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची कॉफी कडवट वाटल्यामुळे त्यांनी ती थोडी गोड करून आणण्यास सांगितले. त्यानंतर रावत व त्यांच्या मित्र कॉफी प्यायला. त्यावेळी रावत यांना ग्लासात काही दिसले. त्यानी बारकाईने पाहिले असता ते झुरळ असल्याचे आढळले. त्यांनी तात्काळ त्याचे छायाचित्र काढून ही बाब हॉटेल व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिली. पण त्यांनी ते मान्य केले नाही. अखेर रावत यांनी काढलेल्या छायाचित्राच्या आधारे याप्रकरणी मालाड पोलिसांकडे तक्रार केली. मालाड पोलिसांनी याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापक, वेटर व संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला.