मुंबई : वडाळा येथे खारफुटीची कत्तल करून त्यावर झोपड्या उभारल्याप्रकरणी वडाळा पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने याप्रकरणी तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – मुंबई : पालिका आयुक्तांनी बोलावल्यानंतरही बैठकीला गैरहजर राहणे अधिकाऱ्याला महाग पडले; अनधिकृत बांधकामांना अभय देणे भोवले

हेही वाचा – मुंबई : चित्रीकरणाच्या माध्यमातून महिलेकडून खंडणी उकळली, आरोपीला पोलिसांकडून अटक

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रताप जगताप (५१) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी वडाळा पोलिसांनी मुरलीलाल गरोडिया व भायराम ढल्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार वडाळा येथील माहुल रोड नाक्याजवळील सीएस क्रमांक १४४ व १४५ येथे हा प्रकार घडला. आरोपींनी या ठिकाणी खारफुटीवर भराव टाकून रस्ता बनावला. तसेच त्या ठिकाणी कामगारांसाठी झोपड्या बांधल्या, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच त्या ठिकाणी मुरूम मातीचा बांध टाकून पाणीही अडवण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वडाळा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai a case has been registered against two people in connection with the slaughter of mangroves in wadala mumbai print news ssb
Show comments