मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील शांतिवन या गृहनिर्माण सोसायटीत शनिवारी मध्यरात्री एका भटक्या कुत्र्याला एअरगनची गोळी लागल्यामुळे तो जखमी झाला आहे. याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी पिता-पुत्राला ताब्यात घेतले आहे. दोघांपैकी कोणी कुत्र्याला जखमी केले, याबाबत पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा – राज्यातील हवामानात येत्या २४ तासात मोठे बदल
हेही वाचा – नागपूरमध्ये मध्यरात्रीनंतर थरार, पैशाच्या वादातून भाच्यांचा खून
े
u
भटका कुत्रा भुंकत असल्यामुळे त्याच्या रागातून त्याला एअरगनची गोळी मारण्यात आल्याचा संशय आहे. कुत्र्याला सध्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे ओशिवरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.