मुंबई : घाटकोपर पूर्व येथील कैलास प्लाझा इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

घाटकोपर पूर्व येथील आर. एन. भाटकर मार्गावर ऑडीन मॉलच्या समोरील एका व्यावसायिक इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर आग लागली. घटनास्थळी पोलीस, पालिका विभाग कर्मचारी, विद्युत वितरण कंपनीचे पथक दाखल झाले असून अग्निशमन दलाच्या गाड्यांसोबत रुग्णवाहिकाही रवाना झाली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Story img Loader