मुंबई : मालाड परिसरातील इमारतीच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत बुडून पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. अब्दुल रहीम रियाझ शेख (५) असे मृत मुलाचे नाव आहे. तो कुटुंबियांसोबत मालवणी म्हाडा कॉलनीमध्ये राहत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘आता थांबायचं नाय’, रात्रशाळेतून दहावी उत्तीर्ण झालेल्या कामगारांच्या यशाची कहाणी रुपेरी पडद्यावर

हेही वाचा – मुंबई : विमानतळावरून साडेपाच कोटींचा गांजा जप्त, आरोपीला अटक

शेजाऱ्यांकडे खेळायला जात असल्याचे सांगून अब्दुल सोमवारी दुपारी घरातून बाहेर पडला. त्यानंतर बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. अखेर त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी शेजाऱ्यांकडे विचारपूसही केली. अब्दुल मोबाइल घेऊन आला होता. पण त्यानंतर तो निघून गेला, असे शेजारच्यांनी सांगितले. शेजारी व कुटुंबियांनी अब्दुलचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात एका लहान मुलीला गच्चीवरील पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याचे दिसले. तिने आत डोकावले असता अब्दुल टाकीत आढळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश नगरकर यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai a five year old boy died after drowning in a water tank mumbai print news ssb