मुंबई : रे रोड येथील दारूखाना परिसरातील ब्रिटानिया कंपनीजवळील देवीदयाल कंपाऊंडला गुरुवारी सकाळी १०.४५ च्या सुमारास अचानक आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून आगीची तीव्रता वाढत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा

हेही वाचा – मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!

देवीदयाल कंपाऊंडमधील गोदामाला गुरुवारी सकाळी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्याचसोबत रुग्णवाहिका, पोलीस, बेस्ट उपक्रम, तसेच संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलातील जवान आग विझवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. मात्र आगीची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे अग्निशमन दलाने सकाळी ११ वाजून ४ मिनिटांनी आगीला क्रमांक तीनची वर्दी दिली. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झालेले नाही. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.