घोडपदेव येथे ६५ वर्षीय महिलेचा भाच्याने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी भायखळा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घोडपदेव येथील साहेब मेन्शनमध्ये राहणाऱ्या संतान फर्नांडिस यांनी भाचा ॲन्थोनी फर्नांडिसच्या भावाला कर्ज मिळवून दिले होते. भावाला कर्ज मिळवून देण्यावरून संतान आणि ॲन्थोनीमध्ये मंगळवारी वाद झाला. ॲन्थोनीने संतान यांना बेदम मारहाण केली. पूर्वीपासूनच संतान यांना कमरेचा आणि मणक्याचा आजार होता. त्यातच बेदम मारहाण झाल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

ॲन्थोनीच्या पत्नीने केलेल्या तक्रारीवरून भायखळा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Story img Loader