मुंबई आणि परिसरातील लोकल प्रवास हा दिवसेंदिवस जीवघेणा आणि त्रासदायक होत आहे. पश्चिम, मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर अशा सर्व रेल्वे मार्गावर मिळून जवळपास ९० लाखापर्यंत लोक हे दररोज लोकलने प्रवास करतात. सीएसएमटी ते पनवेल-कसारा-कर्जत असा मध्य रेल्वेचा पसारा असून चर्चगेट ते डहाणू असा पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवेचा ( Suburban Railway ) पसारा आहे. या दोन्ही मार्गावर एकुण २९०० लोकलच्या फेऱ्या दररोज होत असतात.

असं असतांना या मार्गांवर विविध ठिकाणी एसी लोकल ( वातानुकूलित लोकल – AC Local )च्या अत्यंत मर्यादीत फेऱ्या सुरु करण्यात आल्या. मात्र या एसी लोकलचे तिकीटाचे आणि दैनंदिन पासचे दर हे अव्वाच्या सव्वा – सर्वसामान्यांच्या बजेटच्या पलिकडे असल्याने या एसी लोकलकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. त्यातच काही एसी लोकलच्या फेऱ्या या ऐन गर्दीच्या वेळी सुरु केल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. कारण एक लोकल कमी करत ही एसी लोकल आल्याने, यामधून फार कमी प्रवासी प्रवास करत असल्याने या लोकलच्या मागे-पुढे असलेल्या लोकलमधील गर्दी वाढलेली बघायला मिळाली. त्यामुळे या एसी लोकल बंद करण्याची मागणी प्रवाशांकडून व्हायला लागली.

Mumbai Municipal Corporation Debris on Call service for household level construction waste collection goes online Mumbai
घरगुती स्तरावरील बांधकामाचा कचरा वाहून नेण्यासाठी मुंबई महापालिकेची ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवा ऑनलाईन
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
anti-ragging rules, non-compliance of anti-ragging rules, National Medical Commission,
रॅगिंगविरोधी नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा वैद्यकीय महाविद्यालयांना इशारा
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?

म्हणनूच आज भायखळा इथे झालेल्या रेल्वेच्या एका कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री राबसाहेब दानवे यांनी एसी लोकलच्या तिकीटाचे दर हे ५० टक्क्यांनी कमी करत असल्याचं जाहीर केलं. यामुळे सीएसएसटी ते ठाणे या ३४ किलोमीटरच्या एसी लोकलमधील प्रवासाला एका तिकीटासाठी १३० रुपये मोजावे लागायचे तिथे आता ९० रुपये आकारले जाणार आहे. तर चर्चेगेट ते वसई रोड या ५२ किलोमीटरच्या प्रवासाला २१० रुपये द्यावे लागायचे तिथे आता १०५ रुपये द्यावे लागणार आहेत. तेव्हा एसी लोकलचे तिकीटाचे दर हे पुढीलप्रमाणे असतील….

किलोमीटरसध्याचे दरसुधारीत दर
६५३०
२५१३५६५
५०२०५१००
१००२९०१४५
१३०३७०१८५

असं असंल तरी रेल्वे राज्यमंत्री यांनी तिकीटाचे दर हे ५० टक्क्यांनी कमी केले आहेत, याची अंमलबजावणी कधीपासून केली जाणार हे मात्र स्पष्ट केलेलं नाही. दैनंदिन पास किंवा मासिक पासबाबत मात्र कोणतीही घोषणा केलेली नाही. कारण दररोज लोकलने प्रवास करणारा प्रवासी हा तिकीट न काढता एक महिन्याचा-तीन महिन्याचा पास काढणे पसंद करतो. तेव्हा पासबाबत घोषणा केली जाणार का, किंवा कधी केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेलं असेल. कारण एसी लोकलचे पासचे दर कमी केल्यास सहाजिक लोकलमधील प्रवाशांचा प्रतिसाद वाढण्यास मदत होणार आहे.

Story img Loader