Mumbai Accident BMW Mercedes Race on Bandra Worli Sea-Link : मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवर भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. शर्यतीच्या नादात दोन आलिशान गाड्यांनी एका टॅक्सीला धडक दिली आहे. या अपघातात मोठी वित्तहानी झाली आहे. तसेच टॅक्सीमधून प्रवास करणाऱ्या कुटुंबातील चार सदस्य व टॅक्सीचालक जखमी झाला आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. दरम्यान,या अपघाताप्रकरणी दोन्ही आलिशान गाड्या चालवणाऱ्या इसमांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टॅक्सीमधून लहान मुलासह एका कुटुंबातील चार सदस्य प्रवास करत होते. या अपघातात सुदैवाने त्यांचा जीव बचावला, मात्र ते जखमी झाले आहेत.

वांद्रे-वरळी सागरी सेतूवर बीएमडब्ल्यू व मर्सिडीज चालकांनी शर्यत लावली होती. दोघेही वाऱ्याच्या वेगाने आपापल्या कार चालवत होते. काही अंतर पुढे गेल्यावर समोर एक टॅक्सी होती. त्याचवेळी या दोन्ही कारचालकांचं कारवरील नियंत्रण सुटलं. या दोन्ही आलिशान गाड्यांनी टॅक्सीला धडक दिली. कार पूलावरच उलटली. सुदैवानी टॅक्सीमधील प्रवासी वाचले. वरळी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही गाड्या जप्त केल्या. तसेच मर्सिडीज व बीएमडब्ल्यू चालकांना अटक केली आहे.

Massive fire breaks out in Kurla news in marathi
कुर्ल्यातील उपाहारगृहात भीषण आग
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
kalyan Drunk and drive drunkard car driver
कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक, कार चालक अनिल तिवारी पोलिसांच्या ताब्यात
Traffic congestion persists despite 33 bridges in Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ३३ पूल; वाहतूककोंडी मात्र कायम
Ajith racing accident
Ajith Kumar : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा मोठा अपघात, रेसच्या सरावदरम्यान क्रॅश झाली कार; दुर्घटनेचा Video Viral
Jammu Kashmir Truck Accident
Jammu Kashmir Truck Accident : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक दरीत कोसळला; तीन जवानांचा मृत्यू
Policeman killed in Navi Mumbai crime news
नवी मुंबईत पोलिसाची हत्या, मृतदेह ट्रॅकवर फेकला..
Two people on two-wheeler died in collision with speeding car
भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, लोहगाव परिसरातील घटना

हे ही वाचा >> पुनर्विकासातील सामान्यांच्या ‘म्हाडा’ सदनिका अद्याप विकासकांकडेच? सर्वोच्च न्यायालयाकडूनही अहवाल सादर करण्याचे आदेश

वांद्रे वरळी सागरी सेतूवर नेमकं काय घडलं? पोलीस माहिती देत म्हणाले…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीएमडब्ल्यू व मर्सिडीज चालकांनी आपसात शर्यत लावली होती. दोघेही वांद्रे-वरळी सागरी सेतूवर सुस्साट वेगाने कार चालवत होते. मात्र दोघांचंही कारवरील नियंत्रण सुटलं व त्यांनी त्याच पूलावरून जाणाऱ्या एका टॅक्सीला धडक दिली. दोन भरदाव गाड्यांच्या धडकेनंतर टॅक्सी उलटली. टॅक्सीमधील प्रवासी सुदैवाने वाचले. मात्र त्यांना दुखापत झाली आहे. टॅक्सीमधील प्रवासी व चालकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वरळी पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी बीएमडब्ल्यू व मर्सिडीज चालकांना अटक केली. त्यांच्यावर भरदाव वेगाने गाडी चालवणे, शर्यत लावल्याप्रकरणी आणि अपघाताप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा >> नायर रुग्णालय प्रकरण : वैद्यकीय विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाप्रकरणी सहयोगी प्राध्यापकाचे निलंबन

कुठे झाला अपघात?

रविवारी पहाटे १०.३० च्या सुमारास ही घटना घडली आहे. पूलाच्या १९ क्रमांकाच्या पिलारजवळ हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टॅक्सीमधील प्रवासी जखमी झाले आहेत.

Story img Loader