मुंबई: अमली पदार्थ बाळगण्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात असलेल्या एका आरोपीने पोलिसांना गुंगारा देत पहिल्या मजल्यावरून उडी घेत पळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घाटकोपर पोलीस ठाण्यात घडली. त्यात आरोपीच्या पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिस खान (३०) असे या आरोपीचे नाव असून तो घाटकोपर परिसरात राहणारा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – गोरेगावमधील पीएमवाय घरांच्या किंमतीत वाढ, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून किंमत निश्चित

हेही वाचा – भटके श्वान का आणि कसे आक्रमक होतात ? याचे मूल्यांकन न्यायालय नाही, तर तज्ज्ञांनी करावे, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

पोलिसांनी ३० जुलैला घाटकोपर परिसरातून त्याला दोन लाख रुपयांच्या अमली पदार्थांसह ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर गुंडा विरोधी पथकाच्या खोलीत या आरोपीला ठेवण्यात आले होते. मात्र त्याचवेळी आरोपीने खोलीबाहेर धाव घेऊन, पहिल्या मजल्यावरून उडी घेत पळण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे असलेल्या पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ आरडाओरडा केला. त्यानंतर इतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेतल्याने त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली असून पोलिसांनी तत्काळ त्याला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे.