मुंबई: घराबाहेर पार्क केलेल्या महागड्या दुचाकी चोरून त्यांची विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी तीन दुचाकी हस्तगत केल्या असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

ट्रॉम्बेच्या चिता कॅम्प परिसरात राहणारे अन्वर खान (२८) या तरुणाने त्याची दुचाकी ३० जुलैला घराजवळ उभी केली होती. मात्र त्याच रात्री चोरट्याने बनावट चावीच्या आधारे ती चोरून पोबारा केला. याबाबत खान यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिसरातील काही सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेऊन पोलिसांनी पाहणी केली असता त्यात आरोपीचा चेहरा कैद झाला होता. त्यानुसार पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून चिता कॅम्प परिसरातूनच त्याला अटक केली.

Gang involved in gold chain and vehicle theft arrested
सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी उघडकीस; सराईत अटकेत, दोन अल्पवयीन ताब्यात
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण
kalyan Dombivli police
कल्याण – डोंबिवलीत चोरीचा एक कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल नागरिकांना परत
Nagpur Police seized Rs 3 crore worth of stolen goods returning them to complainants
“तुमच्या घरातून चोरी झालेले दागिने सापडले…” पोलिसांनी ३ कोटींचा मुद्देमाल…
police failed to prove, conviction , accused driving car allegation, mumbai,
बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप : आरोपीच गाडी चालवत असल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश, शिक्षा रद्द
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”
Mumbai police register fraud case of Rs 2 crore against gujarat man
दोन कोटींच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल; रक्कमेतून आरोपीने बंगला बांधला, तसेच दुबईतून दागिने खरेदी केल्याचा आरोप

हेही वाचा – भटके श्वान का आणि कसे आक्रमक होतात ? याचे मूल्यांकन न्यायालय नाही, तर तज्ज्ञांनी करावे, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

हेही वाचा – मुंबई : पोलीस ठाण्यातून आरोपीचा पळण्याचा प्रयत्न, पायाला दुखापत

फरदिन सय्यद (१९) असे आरोपीचे नाव असून तो त्याच परिसरातील राहणारा आहे. तपासात त्याने गुन्ह्याची कबुली देत, अशाच प्रकारे तीन दुचाकी चोरल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून तीन दुचाकी हस्तगत केल्या असून पोलीस त्याच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.

Story img Loader