मुंबई : वाढती महागाई आणि लहान मुलांमधील मोबाइलचा वाढता वापर यामुळे पतंग व्यवसायावर संक्रात आली आहे. गेली काही वर्षे सातत्याने वाढत असलेली महागाई आणि मोबाइलच्या अतिवापरामुळे यंदा पतंग विक्रीच्या व्यवसायात सुमारे ४० टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे हा व्यवसाय संकटात सापडला असून, पुढील काही वर्षांमध्ये मुंबईतील पतंग व्यवसाय ठप्प होण्याची भीती डोंगरी परिसरातील पतंग विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबईमध्ये साधारणपणे ऑगस्टपासून पतंग उडविण्याला सुरुवात होते. मकर संक्रांतीच्या दिवशी बहुतांश मंडळी पतंग उडविण्यात दंग असतात. पतंग विक्रीच्या व्यवसायाला ऑगस्टपासून सुरुवात होत असे. मात्र, आता डिसेंबरमध्ये पतंग विक्रीला सुरुवात होते. मागील काही वर्षांपासून सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे पतंग उडविण्याकडे नागरिकांचा कल कमी झाला आहे. महागाईमुळे या व्यवसायीकांचे कंबरडे मोडले आहे. पूर्वी मोठ्यांबरोबरच लहान मुलांचा पतंग उडविण्याकडे अधिक कल असायचा.

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
world eyes on donald trump dealing with big tech during his second term of us president
बलाढ्य टेक कंपन्यांसाठी ट्रम्प यांच्या विजयाचा अर्थ काय ?
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
young mans mobile was stolen
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकाविला
maharashtra assembly election 2024 Candidates mobile call whatsapp call
उमेदवार दक्ष ! मोबाईल नाहीच, ओन्ली व्हॉटसअ‍ॅप कॉल
Adulterated food pune, Food and Drug Administration pune, Diwali, Adulterated food,
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा लाखोंचा बाजार! पुणे विभागात दसरा, दिवाळीत अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

हेही वाचा…भारतातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेच्या deposits मध्ये तब्बल पाच हजार कोटींची घट

मात्र लहान मुले मोबाइलमध्ये दंग होत असून त्यांना मैदानी खेळांऐवजी मोबाइलमधील खेळ आवडू लागले आहेत. क्रिकेट वगळता कोणताही खेळ खेळताना मुले दिसत नाही. मुले पतंगासाठी हट्ट करत नाहीत आणि पतंग उडवणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवण्याचा पालकांचा त्रास कमी झाला आहे. त्याचा परिणाम पतंग व्यवसायावर होताना दिसत असल्याची माहिती डोंगरी काईट सेंटरचे मालक मोहम्मद मलिक अन्सारी यांनी दिली. मुंबईतील वाढत्या टॉवर संस्कृतीमुळे अनेक मुले घरातून बाहेर पडत नाही, तसेच टॉवरच्या गच्चीवरून पतंग उडविण्यास परवानगी दिली जात नाही.त्यामुळे टॉवरमध्ये राहणारी मुले पतंग खरेदीसाठी कमी येतात. याउलट गोवंडी, मानखूर्द, कुर्ला येथील झोपडपट्ट्यांमधील मुले पतंग खरेदीसाठी येत असल्याचे अन्सारी यांनी सांगितले.

वाढती महागाई, सरकारकडून घालण्यात येणारी बंदी, मुंबईत उभे राहणारे टॉवर आणि लहान मुलांमधील मोबाइलच्या वाढत्या वापराचा परिणाम पतंग व्यवसायावर होत आहे. वाढत्या महागाईमुळे काही वर्षांपूर्वी एक रुपयाला मिळणारी पतंग आता पाच रुपयांना मिळत आहे. त्यामुळे पूर्वी मकर संक्रांतीसाठी साधारणपणे दोन ते तीन हजार रुपयांच्या पतंग विकत घेणारी व्यक्ती आता १००० रुपयांच्या पतंग व मांजा घेण्यासाठीही अनेकदा विचार करत आहेत.

हेही वाचा…मुंबई महानगरात महायुतीचा ‘राम-सेतू’ पॅटर्न

पतंग उडविण्यासाठी मोकळी जागा असणे आवश्यक असते. मात्र मुंबईमधील मैदाने नष्ट होऊन उभे राहत असलेल्या टॉवरमुळे पतंग उडविताच येत नाहीत. तसेच लहान मुलांमध्ये मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे पतंग खरेदी करण्याकडे पालकांचा कल कमी होत आहे. अशा अनेक समस्यांचा पतंग व्यवयाय सामना करत असताना राज्य सरकारकडून मांजाच्या वापरावर निर्बंध घालण्यात आल्याने पतंग व्यवसायाला घरघर लागली असल्याचे इंडियन फायटर काईट्सचे मालक ए.आर.खान यांनी सांगितले.

पूर्वी ऑगस्टपासून पतंगांची विक्री होत असे, मात्र आता फक्त जानेवारीच्या १५ दिवसांमध्येच पतंगाची विक्री होते. त्यातही यंदा दोन दिवसांवर मकर संक्रांत आली तरी अद्याप फारसे ग्राहक पतंग खरेदीसाठी आलेले नाहीत. मागील काही वर्षांमध्ये पतंग व्यवसायामध्ये ४० टक्क्यांनी घट झाली आहे.

नव्या पीढीची व्यवसायाकडे पाठ

पूर्वी ऑगस्टपासून चालणारा हा व्यवसाय आता फक्त मकर संक्रातीपुरताच चालतो. त्यामुळे वर्षभर पतंग सांभाळून ठेवणे, कमी होणारा व्यवसाय, कामगारांचे वेतन, दुकानातील अन्य खर्च यानंतरही जानेवारीमध्ये पतंग विक्री होण्याची शक्यता कमी यामुळे हा व्यवसाय करणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे या व्यवसायामध्ये नवीन पीढी येण्यास तयार नाही. परिणामी पुढील आठ ते १० वर्षांनंतर मुंबईमधील पतंग व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता पतंग व्यवसायिकांनी वर्तवली.

हेही वाचा…पैसे देऊन चूक माफ केली जाऊ शकत नाही, अग्निसुरक्षा नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी उच्च न्यायालयाचे महापालिकेला खडेबोल

पतंगाच्या किमती

साधा पतंग – ५ रुपये

काटॅूनची पतंग – १० रुपये

साधा फॅन्सी पतंग – ७० रुपये

मेटॅलिक पतंग – १० रुपये

मेटॅलिक फॅन्सी पतंग – १२० रुपये

ढाल – १०० रुपये

चायनीज पतंग – १२० रुपये

१ कोडी (२० साधा पतंग) – ६० रुपये

१ कोडी (२० प्लास्टिक पतंग) – १०० रुपये

मांजाच्या किमती

१०० मीटर – ३० रुपये

१००० मीटर – ४०० रुपयांपासून