ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जमीन अधिग्रहणाचा तिढा सुटणार
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात महाराष्ट्रातील १०८ गावे या प्रकल्पात येत असून जमीन अधिग्रहणासाठी विरोध होत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ३० गावांपैकी १७ गावांना नमुना १ फॉर्म पाठवून संपर्क साधला आहे. याचबरोबर पालघर जिल्ह्यातीलही ७३ गावेही लवकरच जोडली जाणार आहेत. महाराष्ट्रातील जमीन अधिग्रहणाचा प्रश्न लवकरच सुटण्याच्या मार्गावर असून प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण जमिनीच्या अधिग्रहणासाठी तब्बल १० हजार कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आल्याची माहिती नेशनल हाइस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचल खरे यांनी दिली.
मुंबई ते अहमदाबाद मार्गावर वेगवान अशी बुलेट ट्रेन चालविण्यात येणार आहे. ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावणारी बुलेट साधारण अडीच ते तीन तासात अंतर पार करेल. या प्रकल्पासाठी एकूण १४०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन लागणार आहे. यात महाराष्ट्रातील ३५३ हेक्टर जागेचा समावेश आहे. प्रकल्पात महाराष्ट्रातील १०८ गावे येत असून यामधे पालघर जिल्ह्यातील ७३ गावे, ठाणे जिल्ह्यातील ३० गावे आणि मुंबईतील पाच ठिकाणांचा समावेश आहे. जमीन अधिग्रहणासाठी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील काही गावांमधून विरोध होत आहे. मात्र हा विरोध मावळला असून स्थानिकांशी जमीन अधिग्रहणासाठी संपर्क साधत असल्याचे आचल खरे यानी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील ३० गावांपैकी १७ गावांना नमुना १ नोटीस राज्य सरकारकडून पाठवून त्यांचाशी संपर्क साधण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील अन्य गावांशीही आणि पालघर जिल्ह्यातील ७३ गावांतील जमीन अधिग्रहणाचा प्रश्नही लवकरच सुटेल, अशी आशा खरे यांनी व्यक्त केली.
नमुना १ म्हणजे काय
जमिनीचे गट नंबर, सर्वे नंबर यात दर्शविलेली असते. तसेच जमिनीचा आकार, गावातील जमिनीवरील अतिक्रमण, वन जमीन, सरकारच्या जमिनीची माहितीही त्यात मिळते.
२४ बुलेट ट्रेन
बुलेट ट्रेन प्रकल्पात २४ गाडय़ा येणार आहेत. यात सुरुवातीला एक किंवा दोन बुलेट ट्रेन जपानमधून येतील. तर अन्य ट्रेन जपानच्या सहकार्याने भारतातच बनविण्यात येणार आहेत. १० आणि बारा डब्यांच्या या ट्रेन असतील. दहा डब्यांच्या गाडीत ७५० आसन व्यवस्था असेल. तर १६ डब्यांच्या गाडीत १२५० आसने असतील. २०२३ सालापर्यंत १० डब्यांची गाडी येईल आणि १६ डब्यांची गाडी २०३३ पर्यंत येणार आहे. यामधे बिझनेस आणि स्टँडर्ड अशा दोन श्रेणी असतील.
रस्ते आणि विमान वाहतुकीवरील ताण कमी होणार
बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते अहमदाबाद दरम्यानच्या रस्ते आणि विमान वाहतुकीवरील ताणही कमी होण्यास मदत मिळेल. बुलेट ट्रेन सुरू होताच ४७०० विमान प्रवासी आणि ४० हजार रस्ते आणि रेल्वे प्रवासी वळते होतील.
दीडपटीने भाडे जास्त
सध्या मुंबई ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या राजधानी किंवा शताब्दी एक्स्प्रेसपेक्षाही दीडपटीने भाडे जास्त ठेवण्यावर विचार केला जात आहे.
मानसिकता बदलण्याचा प्रयत्न – लोहानी
रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा, सुविधा या सर्व गोष्टीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यात सुधारणा होणे गरजेचे आहे. त्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मत रेल्वे मंडळाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी यांनी व्यक्त केले. प्रोटोकॉल, गिफ्ट यासारखे प्रकार बंद करण्यात आले. विचार बदलले तर बरीच सुधारणा होऊ शकते. त्यामुळेच त्यांचे विचार बदलण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे लोहानी म्हणाले. एल्फिन्स्टन रोड स्थानकातील अपघातानंतर नवीन पादचारी पूल बनवण्यात येत आहेत. त्यासाठी होणारी निविदा प्रक्रियाही लवकरात लवकर राबवून त्याला निधी उपलब्ध केला जात आहे. मात्र ही कामे त्वरित पूर्ण झालीच पाहिजेत, असेही सांगितले. रेल्वे बोर्डाकडून आयोजित रेल्वे कार्यशाळेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. गाडय़ांचा वक्तशीरपणा सुधारण्याबरोबरच रेल्वे जमिनीवर असणारे अतिक्रमण यावरही तोडगा काढला जात असल्याचेही लोहानी यांनी सांगितले.
आणखी काय असतील सुविधा
- उत्तम दर्जाची आसन व्यवस्था
- आधुनिक प्रसाधनगृहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे.
- एखादा प्रवासी आजारी झाल्यास आरामासाठी स्वंतत्र छोटी खोली.
- डब्यात सीसीटीव्ही, आपत्कालीन इंटरकॉम यंत्रणा
- स्वयंचलित ट्रेन नियंत्रण यंत्रणा
- स्वयंचलित ब्रेक यंत्रणा