मुंबई : मुंबईतील हवेच्या दर्जाची मंगळवारी ‘मध्यम’ श्रेणीत नोंद झाली. समीर’ ॲपनुसार मंगळवारी सायंकाळी मुंबईच्या हवेचा निर्देशांक १२१ इतका होता. गेले काही दिवस मुंबईतील विविध भागांतील हवा गुणवत्तेची ‘वाईट’ श्रेणीत नोंद होत होती. समीर ॲपच्या नोंदीनुसार मंगळवारी सायंकाळी कुलाबा येथील हवा निर्देशांक १२८, तर देवनार येथील १२५ होता. तसेच, बोरिवली येथील हवा निर्देशांक ८० इतका होता. म्हणचेच कुलाबा, देवनार येथील हवा ‘मध्यम’, तर बोरिवलीमधील हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली गेली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे रेल्वेगाड्या रखडणार

दरम्यान, सोमवारी सायंकाळी हवा ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली होती. मागील अनेक दिवस मुंबईतील हवेचा दर्जा खालावलेला होता. अनेक भागातील हवेची ‘वाईट’ ते ‘मध्यम’ श्रेणीत नोंद झाली होती. मात्र, मागील दोन दिवसांपासून हवेच्या दर्जामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. मंगळवारी बोरिवली आणि मुलुंड येथे ‘समाधानकारक’ हवेची नोंद झाली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रम मंडळाच्या निकषांनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक ०-५० दरम्यान ‘चांगले’, ५१-१०० दरम्यान ‘समाधानकारक’, १०१-२०० दरम्यान ‘मध्यम’, २०१-३०० दरम्यान ‘वाईट’, ३०१-४०० दरम्यान ‘अत्यंत वाईट’ आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे हवेची गुणवत्ता ‘अतिधोकादायक’ समजली जाते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai air quality remains in moderate category mumbai print news zws