मुंबई : गेले अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावलेली आहे. मुंबईची हवा जरी ‘मध्यम’ श्रेणीत नोंदली गेली असली तरी बुधवारी मुंबईच्या वेगवेगळ्या केंद्रावर हवेची श्रेणी ‘वाईट’ असल्याची नोंद झाली. या भागातील हवा सलग दुसऱ्या दिवशी खालावलेली होती.

वातावरण बदल आणि बांधकामे यामुळे मुंबईच्या हवेवर सातत्याने परिणाम होत आहे. यामध्ये पीएम२.५ चे प्रमाण अधिक आहे. समीर ॲपच्या नोंदीनुसार बुधवारी काही भागात पीएम २.५ चे प्रमाण अधिक होते. माझगाव, नेव्ही नगर, कुलाबा, मालाड आणि बोरिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. येथील हवा निर्देशांक अनुक्रमे २०३, २५२, २०४, २३२ इतका होता. तर इतर भागात मध्यम श्रेणीत हवा गुणवत्ता नोंदली गोली. तेथील निर्देशांक १०० ते २०० पर्यंत होता. मुंबईकरांना सध्या प्रदूषणाचा त्रास होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मुंबईकर चिंतीत आहेत.

हेही वाचा >>> मुलुंड न्यायालयात साप आढळल्याने घबराट, तासाभराच्या गोंधळानंतर कामकाज सुरळीत

समीर ॲपच्या नोंदीनुसार बुधवारी झालेली हवेची नोंद

वरळी – १३७

भायखळा- १२०

शीव – १४३

चेंबूर – ११७

देवनार – १५८

कुर्ला – ११०

मुलुंड – ११८

मुंबईचा पारा २७ अंशावार

मुंबईच्या कमाल तापमानात सोमवारपासून घट होत आहे. संपूर्ण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील २० दिवस कमाल तापमान चढे असताना सलग दुसऱ्या दिवशी कमाल तापमान ३० अंशाच्या आत नोंदले गेले. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी २७.५ अंश सेल्सिअस, तर, सांताक्रूझ केंद्रात २९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा केंद्रात सोमवारच्या तुलनेत मंगळवारी १.५ अंशानी कमी तापमान नोंदले गेले. किमान तापमानात देखील किंचित घट झाली आहे.

Story img Loader