मुंबई : जयपूर – मुंबईदरम्यान विमान प्रवास करून मुंबई विमानतळावर उतरलेल्या दोन प्रवाशांकडून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ७ कोटी ६९ लाख रुपये किंमतीचे ९४८७ ग्रॅम सोने जप्त केले.
जयपूर – मुंबई विमानातून प्रवास करणारे दोन प्रवासी सोन्याची तस्करी करीत असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयातील अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर पाळत ठेवली होती. जयपूर – मुंबई विमानातून उतरलेल्या दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अडवूले. त्यांच्या सामानाची तपासणी केली असता त्यात ७ कोटी ६९ लाख रुपयांचे ९४८७ ग्रॅम सोने सापडले. दोन्ही प्रवासी बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करीत असल्याचेही आढळून आले. दोन्ही प्रवाशांना सीमा शुल्क कायदा १९६२ च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली.