मुंबई : जयपूर – मुंबईदरम्यान विमान प्रवास करून मुंबई विमानतळावर उतरलेल्या दोन प्रवाशांकडून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी ७ कोटी ६९ लाख रुपये किंमतीचे ९४८७ ग्रॅम सोने जप्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : अश्लील साहित्य म्हणून जप्त केलेल्या कलाकृती नष्ट करू नका, सीमाशुल्क विभागाला उच्च न्यायालयाचे बजावले, एन. सौझा, अकबर पदमसी यांच्या कलाकृतींचा समावेश

जयपूर – मुंबई विमानातून प्रवास करणारे दोन प्रवासी सोन्याची तस्करी करीत असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयातील अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर पाळत ठेवली होती. जयपूर – मुंबई विमानातून उतरलेल्या दोन प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अडवूले. त्यांच्या सामानाची तपासणी केली असता त्यात ७ कोटी ६९ लाख रुपयांचे ९४८७ ग्रॅम सोने सापडले. दोन्ही प्रवासी बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करीत असल्याचेही आढळून आले. दोन्ही प्रवाशांना सीमा शुल्क कायदा १९६२ च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai airport gold of rupees 7 crores seized mumbai print news css