मुंबई : छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानळावरील धावपट्ट्या मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्ती कामानिमित्त ९ मे रोजी बंद राहणार आहेत. सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान सहा तासांमध्ये धावपट्टीचे, धावपट्टीच्या बाजूला असलेल्या दिव्यांची दुरूस्ती, एरोनॉटिकल ग्राउंड दिव्यांमध्ये बदल आदी कामे करण्यात येणार आहेत.
सकाळी ११ पूर्वी आणि सायंकाळी ५ नंतर विमान सेवा सुरू राहणार आहेत. मुंबई विमानतळ प्रशासनाने सहा महिने आधीच विमान कंपन्या आणि विमान वाहतूक प्राधिकरणांना धावपट्टीच्या देखभाल दुरूस्तीच्या कामाच्या नियोजनाची माहिती दिली होती.
हेही वाचा…लोकलच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू, लोकल सेवा विस्कळीत
त्यानुसार विमानाचे नियोजित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने मुंबई विमानतळ प्रशासनाने हे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.