सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन वेगवेगळ्या घटना मुंबई विमानतळावर उघडकीस आल्या असून याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७३ लाखांचे सोने जप्त करण्यात आले आहे. हे दोन्ही प्रवासी एकाच विमानातून सिंगापूरहून भारतात आले होते बुधवारी सकाळी ११च्या सुमारास सिंगापूरहून आलेल्या (एस क्यू ४२२) विमानातून खमर अब्बास (३१) आणि सईद मोहम्मद थमिल (२४) हे दोन प्रवासी उतरले होते. हवाई गुप्तचर विभागाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांनी तस्क री करून आणलेले सोने सापडले. अब्बासकडे १ किलो सोन्याचा बार आणि साडेतीनशे ग्रॅम सोने सापडले. त्याची किंमत सुमारे ३६ लाख रुपये आहे. थमिलकडेही जवळपास तेवढेच सोने सापडले. या दोघांकडून जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे ७३ किलो असल्याचे हवाई गुप्तचर खात्याचे उपायुक्त रिषी यादव यांनी सांगितले. आपण एकमेकांना ओळखत नसल्याचा दावा या दोघांनी केला. विशेष म्हणजे दोघेही ४ ऑक्टोबरला चेन्नईहून सिंगापूरला गेले होते. त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले.
सोन्यावर आयात शुल्क १० टक्क्यांनी वाढवल्याने सोन्याच्या तस्करीत वाढ झाली आहे. चालू वर्षांत सप्टेंबपर्यंत सोन्याच्या तस्करीची एकूण ५९ प्रकरणे उघडकीस आली असून त्यात ५५ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा